उबाठा शिवसेनेला लागलीये गळती; पण त्यांचे प्रवक्ते घालताहेत भाजपलाच फुटीची भीती!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : एकीकडे उबाठा शिवसेनेला लागलीये गळती; पण त्यांचे प्रवक्ते घालतात भाजपला फुटीची भीती!!, असला प्रकार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सुरू केलाय.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून मुंबईतले 57 नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले. उद्धव ठाकरे यांनी तीनच दिवसांपूर्वी नेमलेल्या प्रवक्त्या संजना घाडी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आल्या. कोकणातून एखाद दुसरी घरवापसी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत झाली. पण त्यापलीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती रोखता आली नाही.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतल्या बहुसंख्य नेत्यांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीला यायचे आहे. पण सध्या आमचे दरवाजे बंद असल्यामुळे त्यांना इकडे येता येत नाही, असा दावा राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला.

चंद्रकांतदादा पाटलांना प्रत्युत्तर देताना उबाठा शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी भाजपलाच फुटीची भीती घातली. भाजप आणि महायुती मध्ये प्रचंड अस्वस्थता आहे‌. अजित पवार यांचे तोंड एकीकडे आहे. एकनाथ शिंदेंचे तोंड दुसरीकडे आहे. अजितदादांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांकडे तक्रार केली. देवेंद्र फडणवीस त्या दोघांना लगाम लावायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महायुतीतच मोठी खदखद आहे. आम्ही भाजपच्या सत्तेत जाण्यापेक्षा भाजपचेच 12 नेते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत. सध्या शिवसेनेचे दरवाजे बंद असल्याने पक्षात येऊ शकत नाहीत, पण लवकरच महायुती फुटेल आणि त्यांचे नेते धडाधड उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत येऊ लागतील, असा दावा आनंद दुबे यांनी केला.

Shivsena ubt claims major split in BJP soon

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात