दिशा सालियन प्रकरणात मोठी हालचाल; तपासाची धुरा आता ‘या’ अधिकाऱ्याकडे

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने या महिन्याच्या सुरुवातीला दिशा सालियनच्या मृत्यूबाबत जो 8 जून 2020 रोजी मालाडमधील एका गृहनिर्माण संस्थेत झाला होता एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले होते. तसेच न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर सोपवली होती. त्यानुसार, सीबीआयने दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू केला आणि मुंबईतील मालवणी पोलिसांना पत्र लिहून या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे सोपवण्याची विनंती केली. त्यानंतर आता सीबीआयने दिशा सालियन मृत्यूप्रकरणार उपअधीक्षक पुरण कुमार यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. Disha Salian death case



मुंबई उच्च न्यायालयाने 8 जून 2020 रोजी मालवणी-मालाड येथील एका गृहनिर्माण संस्थेत घडलेल्या दिशा सालियनच्या मृत्यूबाबत एफआयआर नोंदवण्याचे आणि या प्रकरणाचा तपास सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याकडे सोपवण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या या आदेशानंतर सीबीआयने तातडीने पावले उचलत डीएसपी पुरण कुमार यांची विशेष तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

मालवणी पोलिसांना कागदपत्रे सोपवण्याचे पत्र

तपास अधिकृतपणे सुरू करत सीबीआयने मुंबईतील मालवणी पोलिसांना अधिकृत पत्र पाठवले आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे, पंचनामे आणि पुरावे सीबीआयकडे सुपूर्द करण्याची विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, मालवणी पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व कागदपत्रे तयार ठेवली असून सीबीआयचे पथक या आठवड्याच्या अखेरीस पोलीस ठाण्याला भेट देऊन ही कागदपत्रे ताब्यात घेण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वी, मुंबई पोलिसांच्या तपासात दिशाचा मृत्यू ही आत्महत्येची घटना असल्याचे आणि त्यात कोणताही घातपात नसल्याचे निष्पन्न झाले होते.

Disha Salian death case: DSP Puran Kumar appointed investigating officer

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात