100 देशांत कार, ब्लेंड टी, सॉफ्टवेअर हक्क यासह बऱयाच गोष्टी पुरविणारा उद्योग समूह म्हणून टाटाची ओळख रतन टाटा यांनी मिळवून दिली.Ratan Tata’s biography will be released worldwide in November 2022
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची बायोग्राफी 2022ला जगभरात प्रसिद्ध होईल. ‘रतन टाटा : द ऑथरायजड बायोग्राफी बाय डॉ. थॉमस मॅथ्यू’ या बायोग्राफीच्या प्रसिद्धीचे हक्क ‘हार्परकॉलीन्स’ला मिळाले आहेत.
टाटांच्या जीवनातील महत्त्वाचे पैलू
टाटा ग्रुपच्या चढत्या आलेखामध्ये रतन टाटा यांनी दिलेले योगदान,त्यांनी अमेरिकेत घालवलेला आपला विद्यार्थी दशेतील कालावधी, टाटांची हिंदुस्थानवापसी यासह त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या पैलूंचा उलगडा या बायोग्राफीच्या माध्यमातून जगासमोर येणार आहे.
रतन टाटा यांच्या सर्व वाटचालीचा लेखाजोखा या बायोग्राफीच्या माध्यमातून मांडला जाणार आहे.रतन टाटा यांनी टाटा समूहाला जागतिक पातळीवर उदयास आणले.तसेच टेटली टी, जग्वार लॅण्ड रोव्हर आणि कोरस स्टी यासारख्या कंपन्या त्यांनी घेतल्या.
100 देशांत कार, ब्लेंड टी, सॉफ्टवेअर हक्क यासह बऱयाच गोष्टी पुरविणारा उद्योग समूह म्हणून टाटाची ओळख रतन टाटा यांनी मिळवून दिली. टाटा उद्योगसमूहाला 250 बिलियन डॉलर्सचे भागभांडवल आणि 7 लाख 50 हजार लोकांना रोजगार हिंदुस्थान तसेच जगात नावारूपाला आणले.
Ratan Tata’s biography will be released worldwide in November 2022
महत्त्वाच्या बातम्या
- कोविड वगैरे काही नाही, ही सगळे भाजपची नाटके; कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवकुमार पदयात्रेवर आडले!!
- हे सरकार पार्ट टाईम काम करतयं ,चित्रा वाघ यांची राज्य सरकरावर जोरदार टिका
- भाजप आमदार आशिष शेलार यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या ओसामा समशेर खानला अटक
- आचार्य तुषार भोसले यांनी पंतप्रधान मोदींच्या दिर्घायुष्यासाठी केला महामृत्यूंजय मंत्रजाप