आषाढी वारीचा योग यंदाही नाहीच…पण अंतिम निर्णय कॅबिनेटमध्ये


उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाच मंत्री बैठकीस उपस्थित होते. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत आषाढी वारीच्या नियोजनाची बैठक झाली. निर्णय लांबणीवर टाकण्यात आला असला तरी सरकार दरबारची नकारघंटा वारकऱ्यांना ऐकू आली. त्यामुळे यंदाही आषाढी वारीचा योग लाखो सर्वसामान्य वारकऱ्यांच्या नशिबी येण्याची शक्यता कमीच आहे. No to ‘Ashadhi Wari’ this year too, but the final decision is in the hands of Maharashtra Cabinet


विशेष प्रतिनिधी

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आपण सामना करत आहोत. राज्यातील कोरोना संसर्गाचा आलेख कमी होत असला तरी तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह, वारकऱ्यांच्या आरोग्याचा विचार करणे आवश्यक आहे. अधिक चर्चा करुन आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

आषाढी यंदा वीस जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. या दिवशी पंढरीच्या पांडुरंगांचं दर्शन घेण्यासाठी, चंद्रभागेत स्नान करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपुरात जमतात. शेकडो वर्षांची ही परंपरा मुसलमानी सत्ताकाळात किंवा ब्रिटीश आमदानीत किंवा दुष्काळ, महापूर यानेही कधी खंडीत झाली नाही. परंतु, गेल्यावर्षी पहिल्यांदाच कोरोना महामारीमुळे या वारीची शेकडो वर्षांची परंपरा खंडीत झाली. या पार्श्वभूमीवर यंदाच्या वारीचे काय याची उत्सुकता राज्यातल्या लाखो वारकऱ्यांमध्ये आहे. या संदर्भात शुक्रवारी (दि. 28) पुण्यात बैठक झाली.बैठकीला ठाकरे-पवार सरकारच्या पाच मंत्र्याव्यतिरीक्त आमदार, जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी तसेच देहू संस्थानचे विश्वस्त माणिक मोरे, नितीन मोरे, पालखी सोहळा प्रमुख संजय मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अँड विकास ढगे-पाटील, अभय टिळक यांच्यासह राज्यभरातील वारकरी संप्रदायातील पालखी सोहळा प्रमुख आदी उपस्थित होते. “अगदी मोजक्या वारकऱ्यांसह, सगळ्या अटी-शर्ती पाळून आम्हाला पंढरीची वारी करु द्या, वारीच्या परंपरेला खीळ घालू नका,” असे आर्जव वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींनी मंत्र्यांपुढे केले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह पंढरपूरच्या आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या वारीला शेकडो वर्षांची पंरपरा आहे, मात्र राज्यात कोरोनाचे संकट आहे, कोरोनासोबतच म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे अशा स्थितीत अत्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या सव्वा वर्षापासून आपण सर्व धार्मिक कार्यक्रम घरात राहूनच साजरे केले आहेत. आषाढी वारीची पंरपरा जपण्यासाठी आपण सर्वांनी मांडलेली भूमिका मंत्रीमंडळाच्या येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत मांडण्यात येईल. मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत सर्वानुमते अंतिम निर्णय घेण्यात येईल.

No to ‘Ashadhi Wari’ this year too, but the final decision is in the hands of Maharashtra Cabinet

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर