राज्यात लॉकडाऊन आणखी १५ दिवस वाढविण्याचा विचार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती


राज्यातील अनेक जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट अद्यापही दहापेक्षा जास्त आहे. त्यामुळे आणखी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता आहे. त्याबाबत सर्वांशी चर्चा सुरू आहे. राज्यात 15 दिवसांपेक्षा अधिक दिवसाचा लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे. मात्र, त्याचा अंतिम निर्णय व्हायचा आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.Health Minister Rajesh Tope plans to extend lockdown in the state for another 15 days


विशेष प्रतिनिधी

मुंबई: राज्यातील अनेक जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट अद्यापही दहापेक्षा जास्त आहे. त्यामुळे आणखी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता आहे. त्याबाबत सर्वांशी चर्चा सुरू आहे.

राज्यात 15 दिवसांपेक्षा अधिक दिवसाचा लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे. मात्र, त्याचा अंतिम निर्णय व्हायचा आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.



आरोग्यमंत्री राजेश टोपे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राज्यातील पॉझिटिव्ही रेट 10 टक्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे गो स्लो धोरण अवलंबले पाहिजे. त्यामुळेच 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधी करता लॉकडाऊन वाढवण्याचा विचार सुरू आहे.

गर्दीचे सर्व कार्यक्रम बंदच राहणार आहेत. ज्या जिल्ह्यात कोरोनाचं प्रमाण कमी झालं तिथे काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे.

त्यामुळे या योजनेअंतर्गत रुग्णांनी उपचार घ्यावेत. एकूण 131 रुग्णालयांमध्ये या आजारावर मोफत उपचार करण्यात येत आहेत, असे सांगून टोपे म्हणाले, म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शनचा तुटवडा आहे.

त्यामुळे खासगी हॉस्पिटलमध्ये ते वेळेवर मिळत नाहीत. या इंजेक्शनचं नियंत्रण केंद्र सरकारकडे आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या झोळीत जेवढे इंजेक्शन टाकते त्याप्रमाणेच वाटप केले जात आहे.

Health Minister Rajesh Tope plans to extend lockdown in the state for another 15 days

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात