अनाथांना आधार, देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले ११० अनाथ मुलांचे पालकत्व


कोरोना संकटाच्या काळात अनेक आई-वडीलांचा मृत्यू झाल्याने अनेक बालके अनाथ झाली आहेत. त्यांना आधार देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरसावले आहेत. १०० अनाथ बालकांचे पालकत्व त्यांनी स्वीकारले आहे.Support to orphans, Devendra Fadnavis accepted custody of 110 orphans


विशेष प्रतिनिधी

नागपूर : कोरोना संकटाच्या काळात अनेक आई-वडीलांचा मृत्यू झाल्याने अनेक बालके अनाथ झाली आहेत. त्यांना आधार देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरसावले आहेत. १०० अनाथ बालकांचे पालकत्व त्यांनी स्वीकारले आहे.

नागपूर येथील श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त सोबत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना संकटात आई-वडील गमावलेल्या 100 मुलांना ट्रस्ट आधार देणार आहे.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. केवळ भाषणबाजी न करता पहिल्या दिवशी नोंदणी झालेल्या 100 अनाथ मुलांचं पालकत्व स्विकारलं आहे. नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी हे श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टचे प्रमुख आहेत.

कोरोनाच्या महामारीत अनेकांनी जवळच्या नातेवाईकांना गमावले आहे. कुटुंबेच्या कुटुंबे बाधित झाल्याने अनेक ठिकाणी आई-वडील दोघांचाही मृत्यू झाला आहे. सोबत या उपक्रमातून त्यांना मायेचा आधार देण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, संस्थेत नोंदणी झालेल्या मुलांची संपूर्ण जबाबदारी घेती आहे. संस्थेच्या या संपूर्ण कार्यामध्ये तुम्हाला जी मदत लागेल ती मी करेनच. या कामासाठीची यंत्रणा तुम्ही उभी केली आहे.

त्यासाठी लागणारे संपूर्ण पाठबळ देईल. कुणाला हा विचार संकुचित वाटेल. पण मी ही एक लोकप्रतिनिधी आहे. मलाही मतदारसंघ आहे. त्यामुळे, दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील ज्यांची तुमच्याकडे त्यांची नोंदणी होईल. त्या सर्वांचा खर्च माझ्यावतीने करण्यात येईल.

Support to orphans, Devendra Fadnavis accepted custody of 110 orphans

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय