अविश्वास ठराव आणल्याने चिडून पंचायत समिती सभाकडून सदस्यांवर हल्ला, खेड तालुक्यातील शिवसेनेतील सुंदोपसुंदी उघड


पंचायत समितीच्या सभापतीवरपदावर अविश्वास ठराव आणल्याने चिडून खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांनी आपल्याच पक्षाच्या सदस्यांवर हल्ला केला. यामुळे शिवसेनेतील खेड तालुक्यातील सुंदोपसुंदी समोर आली आहे.Irritated by the no-confidence motion, the Panchayat samiti Sabhapati attacked the members


विशेष प्रतिनिधी

पुणे : पंचायत समितीच्या सभापतीवरपदावर अविश्वास ठराव आणल्याने चिडून खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांनी आपल्याच पक्षाच्या सदस्यांवर हल्ला केला. यामुळे शिवसेनेतील खेड तालुक्यातील सुंदोपसुंदी समोर आली आहे.

खेड तालुका पंचायत समितीचे शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांनी हल्ला केला आहे. पक्षाच्या महिला आणि पुरुष सदस्यांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.



पुण्याजवळील डोणजे येथील डोंगरावरील एका खासगी रिसॉर्टमध्ये हा प्रकार घडला. भगवान पोखरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या हल्याची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेºमध्ये कैद झाली आहेत. या हल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीवरून हा वाद झाला. भगवान पोखरकर यांचा सभापती पदाचा कार्यकाळ संपल्या नंतरही ते इतर सदस्यांना संधी देत नव्हते. म्हणून पंचायत समितीच्या सदस्य असलेल्या सविता सांडभोर यांनी इतर सहा सदस्यांसोबत मिळून पोखरकर विरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला.

त्या ठरावावर येत्या ३१ तारखेला मतदान होणार होतं. त्यामुळे ठराव मांडणारे सर्व सदस्य एका खासगी रिसॉर्ट मध्ये थांबले होते. ही माहिती पोखरकर यांना मिळाली आणि त्यांनी रात्री आपला भाऊ आणि कार्यकर्त्यांसोबत येऊन आमच्यावर बंदूक, कोयता आणि लोखंडी गजानी जीवघेणा हल्ला केला, अशी तक्रार सांडभोर यांनी दिली आहे.

Irritated by the no-confidence motion, the Panchayat samiti Sabhapati attacked the members

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात