हिंदूस्थान अ‍ॅँटिबायोटिक्स कोरोना प्रतिबंधक लसीची परवानगी द्यावी, देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे मागणी


पिंपरी-चिंचवड परिसरातील हिंदूस्थान अ‍ॅँटिबायोटिक्स कंपनीला कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. हिंदूस्थान अ‍ॅँटिबायोटिक्स (एचए) या आजारी उद्योगात लस बनविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आर्थिक मदत देण्यास तयार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारकडून या प्रस्तावाचा गांभिर्याने विचार केला जात आहे.Hindustan Antibiotics should be allowed to Corona Preventive Vaccine , Devendra Fadnavis Demands Union Health Ministry


विशेष प्रतिनिधी

पुणे : पिंपरी-चिंचवड परिसरातील हिंदूस्थान अ‍ॅँटिबायोटिक्स कंपनीला कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

हिंदूस्थान अ‍ॅँटिबायोटिक्स (एचए) या आजारी उद्योगात लस बनविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आर्थिक मदत देण्यास तयार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारकडून या प्रस्तावाचा गांभिर्याने विचार केला जात आहे.पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे म्हणाले, एचएमध्ये कोरोना प्रतिबंधक लस निर्मिती व्हावी यासाठी आम्ही आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी त्यांची चर्चा झाली आहे. आरोग्य मंत्रालय या प्रस्तावाचा गांभिर्याने विचार करत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावेळी उद्योगनगरीमध्ये असलेल्या एचएमध्ये कोरोना प्रतिबंधक लस तयार झाली तर तुटवडा कमी होण्यास मदत होईल, असे सांगून लांडगे म्हणाले,

आम्ही हिंदूस्थान अ‍ॅँटिबायोटिक्सला आर्थिक मदत देण्यास तयार आहोत. मात्र, त्यासाठी करार करण्यास सांगितले आहे. येथे तयार होणारी कोरोना प्रतिबंधक लस पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना प्राधान्याने उपलब्ध करून देण्याची अट घालणार आहोत.

येथील नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाल्यावरच कंपनीने दुसºयांना लस द्यावी.पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनीही एचएला मदतीस महापालिका तयार असल्याचे म्हटले आहे.

गेल्याच महिन्यात हिंदूस्थान अ‍ॅँटिबायोटिक्सने केंद्र सरकारकडे कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करण्याची परवानगी मागितली आहे. हा प्रश्न आपण केंद्रीय आरोग्य मंत्रालयापर्यंत नेला आहे, असे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

जून-जुलैपर्यंत येथे रेमडेसिवीर इंजेक्शन आणि कोरोना प्रतिबंधक लसही बनू शकते.हिंदूस्थान अ‍ॅँटिबायोटिक्सला लस निर्मितीची परवानगी मिळण्याबाबत कंपनीतील अधिकारीही उत्साहित आहे. त्यामुळे आजारी पडलेल्या या कंपनीला नवजीवन मिळणार आहे.

सध्या आम्ही कोरड्या पावडरच्या स्वरुपातील औषध बनवितो. लस बनविण्यासाठी आम्हाला वेट पॉवर इंजेक्टेबल बनवावे लागते. प्राथमिक परवनागी मिळाल्यावरआम्ही त्यासाठी आवश्यक मशीनरींमध्ये बदल करू शकतो, असे एचएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Hindustan Antibiotics should be allowed to Corona Preventive Vaccine , Devendra Fadnavis Demands Union Health Ministry

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण