देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरे – पवार सरकारवर टीकास्र; गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाचे पैसे अजून मिळाले नाहीत!

प्रतिनिधी

अलिबाग : नुसत्या मोठ्या घोषणा झाल्या, पण, अजूनही त्याची पूर्तता झालेली नाही. पैसे मिळालेले नाहीत. निसर्ग चक्रीवादळ, कोरोना-लॉकडाऊन आणि आता हे संकट! Visited the villages Khanav Usar and Vave in Raigad district and understood from the people, the damages caused due to CycloneTaukt

केवळ काही जिल्ह्यांचा प्रश्न असल्याने भरघोस मदत राज्य सरकारने करावी, अशी आमची अपेक्षा आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते कोकण दौऱ्यावर अले आहेत.

त्यांनी अलिबाग बंदर येथे भेट देऊन मासेमार बांधवांशी संवाद साधला. तेथे बोटींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शासनाच्या वतीने तातडीने आणि भरघोस मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच खानाव, उसर आणि वावे या ठिकाणी वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी फडणवीस यांनी केली. त्या नंतर पत्रकारांशी बोलतना त्यांनी राज्य सरकारकडे विविध मागण्या केल्या.

Visited the villages Khanav Usar and Vave in Raigad district and understood from the people, the damages caused due to CycloneTaukt