ऑक्सिजन तुटवड्यावर भारतीय नौदलाचा परिणामकार उपाय; ‘Oxygen Recycling System’ विकसित, सिलिंडरची क्षमता दुप्पट ते चौपट वाढविण्याचा प्रोटोटाइप


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – देशात कोरोना विरोधातील लढाई सुरू असताना विविध पातळ्यांवर वैद्यकीय सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. छोट्या – मोठ्या पातळ्यांवर संशोधन होत आहे. असेच एक संशोधन भारतीय नौदलाने केले आहे. Diving School of Southern Naval Command of Indian Navy has conceptualised and designed the ‘Oxygen Recycling System

भारतीय नौदलाच्या सदर्न नेव्हल कमांडच्या डायव्हिंग स्कूलने ‘Oxygen Recycling System’ (ORS) विकसित केली आहे. देशात सर्वत्र मेडिकल ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना ही प्रणाली संजीवनी ठरणार आहे. या प्रणालीमुळे ऑक्सिजन सिलिंडरची क्षमता दुप्पट ते चौपट वाढू शकते आहे. या प्रणालीचा वापर करण्याचा एक प्रोटोटाइप अर्थात उपकरण डायव्हिंग स्कूलमध्ये विकसित करण्यात आले आणि तो नीती आयोगाच्या सदस्यांना दाखविण्यात आले.

नीती आयोगाने त्याच्या आणखी चाचण्या घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तिरूअनंतपूरमच्या श्रीचित्र तिरूनाल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये या प्रोटोटाइपच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्याचे निष्कर्ष समाधानकारक असल्याची माहिती डायव्हिंग स्कूलने दिली आहे.

या प्रोटोटाइपचे उत्पादन आणि उपलब्धता यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी बोलताना स्थानिक पातळीवर छोट्या – मोठ्या संशोधनांना वाव देण्याचा आग्रह धरला होता. ‘Oxygen Recycling System’ (ORS) हा त्याचाच एक भाग ठरू शकतो. कारण याचा प्रोटोटाइप एका छोट्या सुटकेसमध्ये बसणारा आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.

Diving School of Southern Naval Command of Indian Navy has conceptualised and designed the ‘Oxygen Recycling System

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात