दहावी झालेला करत होता डॉक्टर म्हणून काम, पिंपरीत बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल


दहावी झालेला एक जण डॉक्टर म्हणून काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी येथे उघडकीस आला आहे. एका रुग्णालयाकडून सतत इन्शुरन्स क्लेम यायला लागल्याने हा प्रकार उघडकीस आला.Only 10th pass was working as a doctor, filing a case against a bogus doctor in Pimpri


विशेष प्रतिनिधी

पिंपरी : फक्त दहावी झालेला एक जण डॉक्टर म्हणून काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी येथे उघडकीस आला आहे. एका रुग्णालयाकडून सतत इन्शुरन्स क्लेम यायला लागल्याने हा प्रकार उघडकीस आला.

अक्षय केशव नेहरकर (रा. बिजलीनगर चिंचवड, मूळ रा. पिसेगाव, ता. केज, जि. बीड), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. विशाल भास्कर काटकर (वय ४९, रा. वरळी, कोळीवाड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.



अक्षय याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना पदवी असल्याचे भासवले. वैद्यकीय कन्सल्टंट म्हणून नोकरी मिळवण्यासाठी आयसीआयसीआय जनरल इन्शुरन्स कंपनीस ई-मेलद्वारे रिझ्यूम पाठवला.

त्यामध्ये बीएएमएस तसेच एमडी ॲपियर पदवी टाकून सिटी केअर हॉस्पिटल, युनिक हॉस्पिटल, ओएनपी लीला हॉस्पिटल, ऑनेक्स हॉस्पिटल येथे डॉक्टर म्हणून नोकरी केल्याचे नमूद केले. मुलाखती दरम्यान डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेदिक रिसर्च सेंटर पिंपरी-चिंचवड येथून पदवी घेतल्याचे सांगितले.

पदवीप्रमाणपत्राची मागणी केली असता ते न दाखविता ओनेक्स हॉस्पिटल बिजलीनगर येथे सुमारे एक वर्षापासून डॉक्टर म्हणून नोकरी केली.अक्षय नेहरकर याने आयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स पिंपरी व पुणे विभाग यांच्या कार्यालयीन ईमेल आयडीवर ५ फेब्रुवारी २०२१ रोजी रिझ्यूम पाठवला.

त्याला पिंपरी कार्यालयात मुलाखतीसाठी बोलावले. त्यावेळी तो पदवीची कागदपत्रे सादर करू शकला नाही. तो डॉक्टर म्हणून नोकरी करीत असलेल्या हॉस्पिटलमधून संबंधित इन्शुरन्स कंपनीकडे मोबदल्यासाठी अनेक प्रकरणे आली. त्यामुळे इन्शुरन्स कंपनीला संशय आला.

त्यांनी आरोपीच्या पदवीबाबत संबंधित संस्थेकडे विचारणा केली असता अशी पदवी दिली नसल्याचे २५ मे २०२१ रोजी निष्पन्न झाले. त्यानुसार इन्शुरन्स कंपनीचे विशाल काटकर यांनी पोलिसांकडे तक्रार केली.

अक्षय नेहरकर हा केवळ दहावीपर्यंत शिकला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच त्याने इंग्रजी शिकून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. इन्शुरन्स कंपनीच्या एका प्रतिनिधीचा नोंदणी क्रमांक मिळवून त्याआधारे त्याने काहीजणांना इन्शुरन्स कंपनीकडून लाभ मिळवून दिल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Only 10th pass was working as a doctor, filing a case against a bogus doctor in Pimpri

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात