Pandharpur : पंढरपुरात 15 दिवस मटण-मांस विक्रीवर कडक बंदी; आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय

Pandharpur

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : Pandharpur  आषाढी वारीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीत दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाविकांच्या धार्मिक भावनांचा आदर करत, पंढरपूर शहर आणि नजीकच्या परिसरात १५ जुलै ते २९ जुलै असे सलग १५ दिवस मांस आणि मटण विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.Pandharpur

नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कारवाई

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हे कडक आदेश काढले आहेत. आषाढी यात्रेच्या पवित्र काळात राज्यभरातून लाखो वारकरी पायी चालत पंढरपुरात येतात. या कालावधीत शहरात मांस आणि मटणाची विक्री सुरू राहिल्यास भाविकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. याची दखल घेत प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. पुढील १५ दिवस मटण विक्रीला बंदी असणार असून, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर आणि कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. या निर्णयामुळे मांसाहारी खवय्यांची थोडी गैरसोय होणार असली, तरी वारकरी संप्रदायाकडून या निर्णयाचे मोठे स्वागत केले जात आहे.Pandharpur



वारकऱ्यांच्या सेवेत ५ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस

एकीकडे प्रशासनाने मटण विक्रीवर बंदी आणून धार्मिक पावित्र्य जपण्याचा प्रयत्न केला आहे, तर दुसरीकडे एसटी महामंडळाने वारकऱ्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपूर आगारामध्ये ५ नव्या कोऱ्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या आहेत.

आमदार आवताडेंच्या हस्ते लोकार्पण

या नवीन बसेसचे लोकार्पण पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार आवताडे म्हणाले की, “वारीच्या काळात विठ्ठल भक्तांना उत्तम आणि दर्जेदार वाहतूक सेवा पुरवणे हे आमचे कर्तव्य आहे. यात्रेपूर्वी पंढरपूर आगाराला महामंडळाकडून आणखी काही नवीन गाड्या मिळणार आहेत. लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुलभ व्हावा, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.” या नव्या गाड्यांमुळे वारकऱ्यांना वारीच्या प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे.

15-Day Meat Sale Ban in Pandharpur Imposed for Ashadhi Wari 2026

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात