काल फक्त 9 मंत्री भेटले, आज अजितनिष्ठ गटाचे आमदार पवारांच्या भेटीला; पवारांच्या विश्वासार्हतेवरचे प्रश्नचिन्ह अधिक गडद!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस मधले अजितनिष्ठ गटाचे 9 मंत्री काल यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये जाऊन शरद पवारांना भेटले. प्रफुल्ल पटेल यांनी तर पवारांना राष्ट्रवादी एकसंध ठेवून भाजपच्या पाठीशी उभी करण्याची गळ घातली. पण पवारांनी त्यावर सूचक मौन बाळगले आणि नंतर आपण भाजपबरोबर जाणार नसल्याचे स्पष्ट केले.Only 9 Ministers met yesterday, Ajit dada Group MLAs met Pawar today; The question mark on Pawar’s credibility is darker!!

पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितनिष्ठ सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरवर पोहोचले. तेथे ताबडतोब जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना पाचरण केले आहे. मात्र, या सर्व घडामोडींमुळे शरद पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेवरचे प्रश्नचिन्ह गडद झाले आहे.



पवार नेमकी ही डबल गेम कुणासाठी??, कशासाठी खेळत आहेत?? आणि या डबल गेमचा फायदा नेमका कुणाला होणार आहे??, असे सवाल यातून तयार झाले आहेत.

मुंबईत वेगवेगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आणि विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आज इथेच थांबले. त्यांनी बंगलोर मधल्या विरोधी ऐक्याच्या बैठकीला दांडी मारली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यापुढे स्पष्ट शब्दात नाराजी बोलून दाखवली, तरी देखील संजय राऊत शरद पवारांच्या समर्थनासाठी पुढे आले आणि ते उद्या विरोधी ऐक्याच्या बैठकीसाठी बंगलोरला जाणार असल्याचे सांगितले.

या पार्श्वभूमीवर अजितनिष्ठ गटाचे सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरवर पोहोचले. काळाची गरज लक्षात घेऊन आपण भाजपबरोबर गेले पाहिजे ही अजितनिष्ठ गटाची भूमिका या सर्व आमदारांनी शरद पवारांसमोर मांडली.

मात्र स्वतः सोनिया गांधी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केल्यानंतर पवारांनी आपली डबल गेम खेळल्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर परत एकदा मोठी शंका निर्माण झाली आहे.

Only 9 Ministers met yesterday, Ajit dada Group MLAs met Pawar today; The question mark on Pawar’s credibility is darker!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात