विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर आपले राजकीय महत्त्व घटल्याचे पाहून शरद पवारांनी बंगलोर मधल्या विरोधी ऐक्याच्या बैठकीला दांडी मारली त्याविषयी महाराष्ट्रात वेगवेगळ्या बातम्या व्हायरल झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांच्याकडे उघडणार आज व्यक्त केली. उघड नाराजी व्यक्त केली मात्र संजय राऊत ठाकरेंच्या नाराजीनंतरही पवारांच्या समर्थनासाठी पुढे आले.Pawar absent from opposition unity meeting, Uddhav Thackeray upset
राष्ट्रवादीतल्या फुटी नंतर काल अजित पवारांनी आपल्या 9 मंत्र्यांसह अचानक यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली. प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना राष्ट्रवादी एकसंध राखण्याचा प्रस्ताव दिला. त्यावेळी पवारांनी सूचक मौन बाळगले. पण यशवंतराव चव्हाण सेंटर मधल्या बैठकीनंतर झालेल्या एका कार्यक्रमात मात्र शरद पवारांनी आपण भाजपबरोबर जाणार नसल्याचा स्पष्ट खुलासा केला. याची माहिती शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी सोशल मीडियातून दिली.
दरम्यानच्या बारा तासात भरपूर मोठ्या घडामोडी घडल्या आणि महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी शिंदे – फडणवीस सरकारविरुद्ध केलेल्या आंदोलनात शरदनिष्ठ गटाचे आमदार गैरहजर राहिले. विधानसभेत देखील शरदनिष्ठ गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची खुर्ची मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शेजारी होती.
या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या दुटप्पी राजकीय भूमिकेविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे यांनी पवारांच्या विरोधी ऐक्याच्या बैठकीला दांडी मारण्यावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी ती उघडपणे संजय राऊत यांना बोलून दाखविली. त्यानंतर संजय राऊत शरद पवारांच्या समर्थनासाठी पुढे आले. पवारांचा पक्ष फुटला आहे. त्यामुळे त्यांची मुंबईत हजर राहण्याची आज गरज आहे. मी त्यांच्याशी फोनवर बोललो ते उद्या 10.30 वाजता बंगलोरच्या बैठकीला हजर राहणार आहेत. तसेही विरोधकांच्या आजच्या बैठकीत फार महत्त्वाची कामे नाहीत. त्यामुळे पवारांनी विरोधी ऐक्याच्या बैठकीला दांडी मारल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. ते बंगलोरला उद्या जाणार आहेत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
मात्र गेल्या दोन दिवसातल्या आणि आजच्या शरद पवारांच्या या तळ्यात मळ्यात राजकीय भूमिकेमुळे विरोधकांच्या मनातला संशय अधिक गडद झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more