अंदमानात 710 कोटी रुपयांच्या वीर सावरकर विमानतळ टर्मिनलचे उद्या मोदींच्या हस्ते उद्घाटन


वृत्तसंस्था

पोर्ट ब्लेअर : अंदमानचे निकोबार बेटांवरील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीला नवे देखणे शंखरूप देण्यात आले असून तब्बल 710 कोटी रुपयांच्या या नवीन विमानतळ टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे.Modi to inaugurate Rs 710 crore Veer Savarkar Airport terminal in Andaman tomorrow 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जुलै रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, पोर्ट ब्लेअरच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करतील. सुमारे 40,800 चौरस मीटरच्या एकूण बांधलेल्या क्षेत्रासह, नवीन टर्मिनल इमारत दरवर्षी सुमारे 50 लाख प्रवाशांना हाताळण्यास सक्षम असेल. पोर्ट ब्लेअर विमानतळावर 80 कोटी रुपये खर्चून दोन बोईंग-767-400 आणि दोन एअरबस-321 प्रकारच्या विमानांसाठी उपयुक्त एप्रनही बांधण्यात आले आहे, त्यामुळे विमानतळावर आता एकाच वेळी 10 विमानांच्या पार्किंगची सोय झाली आहे.

या विमानतळाच्या नव्या टर्मिनलला अंदमान निकोबारच्या सुंदर सुरेख समुद्रकिनाऱ्याला शोभेल असे शंख शिंपल्याचे रूप देण्यात आले आहे. हे नवीन टर्मिनल बांधकामाचा खर्च तब्बल 710 कोटी रुपये झाला आहे.

Modi to inaugurate Rs 710 crore Veer Savarkar Airport terminal in Andaman tomorrow

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात