बहुमत चाचणीत राष्ट्रवादीचा डेफिसिट??; अजितदादा, भुजबळ, देशमुख, मलिक गैरहजर राहणार??

प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे सरकारची शक्ती परीक्षा विधानसभेत उद्या झाली तरी देखील राष्ट्रवादीचा डेफिसिट त्यामध्ये दिसण्याची शक्यता आहे. कारण अनिल देशमुख आणि नबाब मलिक हे दोन मंत्री तुरुंगात आहेत. ते शक्तिपरीक्षेच्या वेळी विधानसभेत उपस्थित राहतील की नाही याविषयी शंका आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ हे कोरोना बाधित असल्यामुळे ते घरातच क्वारंटाईन आहेत. त्यामुळे हे मंत्री विधानसभा शक्तिपरीक्षेत हजर राहण्याची शक्यता नाही अशी चर्चा आहे.NCP’s deficit in majority test ??; Ajitdada, Bhujbal, Deshmukh, Malik will be absent



अर्थात हे सगळे बहुमत चाचणी होणार की नाही यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आपले सरकार राजकीय दृष्ट्या अडचणी सापडल्यानंतर सुरुवातीला राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांना कोरोनाची बाधा झाली. राज्यपाल चार दिवसात बरे झाले ते राजभवनवर परतले आणि त्याच दिवशी अजित पवार आणि छगन भुजबळ यांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे हे दोन्ही मंत्री आपापल्या घरात क्वारंटाईन झाले.

राष्ट्रवादीच्या बैठकांना हे दोन्ही मंत्री गेल्या तीन दिवसांमध्ये हजर राहिलेले नव्हते. त्यामुळे उद्या निर्णायक क्षणी अजित पवार छगन भुजबळ, अनिल देशमुख आणि नवाब मलिक विधानसभेत हजर राहण्याविषयी शंका आहे.

NCP’s deficit in majority test ??; Ajitdada, Bhujbal, Deshmukh, Malik will be absent

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात