मोहितेंचा प्रभाव माळशिरसपुरता, तुतारी किंवा पिपाणी हाती घेतली तरी फरक पडणार नाही; अजितदादांच्या राष्ट्रवादीचे भाकित!!


विशेष प्रतिनिधी

सोलापूर : मोहिते पाटील घराण्यातले धैर्यशील मोहिते हे कमळ सोडून आता तुतारी धरणार असले, तरी प्रत्यक्षात मोहित्यांचा प्रभाव फक्त माळशिरस पुरता मर्यादित आहे त्यांनी तुतारी किंवा पिपाणी हाती घेतले तरी फरक पडणार नाही, असे भाकित अजितदादांच्या राष्ट्रवादीने वर्तविले आहे.Mohit’s influence does not matter whether Malshiraspurta, Tutari or Pipani take up; Ajit Dada’s Nationalist Prediction!!



महविकास आघाडीने जागावाटप करत अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर केले. परंतु, माढा मतदारसंघात अजून अजून तरी शरद पवारांना उमेदवार देता आलेला नाही. त्यासाठीच मोहिते पाटलांचे घर पुन्हा एकदा फोडून धैर्यशील मोहिते पाटलांना आपल्याकडे घेऊन त्यांच्या हाती तुतारी सोपवण्याचा पवारांचा मनसूबा आहे. त्यावरूनच अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे.

उमेश पाटील म्हणाले, मोहिते पाटील घराणे आता भूतकाळ झाला आहे. त्यांचे अस्तित्व फक्त माळशिरस तालुक्यापुरते उरले आहे. मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेतली काय आणि पिपाणी घेतली काय, त्याने काहीच फरक पडणार नाही. मोहिते पाटील कुटुंबाला सत्तेचा मलिदा घ्यायचा होता. यासाठी भारतीय जनता पार्टीचा त्यांनी वापर करून घेतला. आता खासदाकीची स्वप्न त्यांना पडू लागली आहेत. परंतु, तुतारी त्यांना झेपणार नाही. तुतारी फुंकताना त्यांना लगेच दम लागेल, असे शरसंधान उमेश पाटील यांनी साधले.

Mohit’s influence does not matter whether Malshiraspurta, Tutari or Pipani take up; Ajit Dada’s Nationalist Prediction!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात