रजनीकांत यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी चाहत्यांची देवाकडे धाव


 विशेष प्रतिनिधी

चेन्नई : सुपरस्टार रजनीकांत यांची शुक्रवारी कॅरोटीड आर्टरी रिव्हॅस्क्युलायझेशन सर्जरी पार पडली आहे. काही दिवसातच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे, असे चेन्नईच्या कावेरी हॉस्पिटलने एका निवेदनात म्हटले आहे.

Fans run to God for Rajinikanth’s health to improve soon

सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांना चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बऱ्याच टेस्ट नंतर कार्टोइड आर्टरी रिव्हॅस्क्युलरायझेशन करण्याचा निर्णय हॉस्पिटलने घेतला होता.

त्यांनी शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली आहे. पण रजनीकांत यांचे चाहते मात्र आपल्या लाडक्या कलाकाराच्या तब्येतीबाबत अजूनही चिंता ग्रस्त आहेत. त्यांच्या बऱ्याच चाहत्यांनी रजनीकांत यांची प्रकृती सुधारावी यासाठी होम हवन करण्यास सुरू केले आहेत.


Superstar Rajanikant : अभिनेता रजनीकांत यांची प्रकृती खालावली ; चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल


तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी देखील सुपरस्टारला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

रजनीकांतचा पुढचा “अन्नात्थे” हा अॅक्शन चित्रपट दीपावली (४ नोव्हेंबर) रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळेच चाहते रजनीकांत यांच्या तब्येतीत सुधारणा होण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत.

Fans run to God for Rajinikanth’s health to improve soon

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात