काश्मीर विषय पेटविण्याचा जेएनयूमधील डाव हाणून पाडला, वकिलाच्या तक्रारीनंतर परिसंवाद रद्द


भारतविरोधी घोषणा देण्यावरून काही काळापूर्वी चर्चेत आलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) परिसंवादाच्या माध्यमातून काश्मीरचा विषय पेटविण्याचा डाव वकिलाच्या तक्रारीने हाणून पाडण्यात आला. हा परिसंवाद प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह होता.JNU’s attempt to ignite Kashmir issue thwarted, seminar canceled after lawyer’s complaint


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतविरोधी घोषणा देण्यावरून काही काळापूर्वी चर्चेत आलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) परिसंवादाच्या माध्यमातून काश्मीरचा विषय पेटविण्याचा डाव वकिलाच्या तक्रारीने हाणून पाडण्यात आला. हा परिसंवाद प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह होता.

काश्मीरच्या मुद्यावर आयोजित केलेला आभासी स्वरूपातील परिसंवादाचा विषय आक्षेपार्ह व प्रक्षोभक होता. परिसंवाद आयोजित करण्यासाठी आयोजकांनी परवानगी घेतली नव्हती, अशी माहिती कुलगुरू एम. जगदेशकुमार यांनी दिली.


शर्जील इमामला न्यायालयाचा दिलासा नाहीच, दंगलप्रकरणी जामीन फेटाळला


जेएनयूच्या द सेंटर फॉर वुमेन्स स्टडीजतर्फे आभासी माध्यमात या परिसंवादाचे करण्यात येणार होते. या परिसंवादाचा विषय जेंडरेड रेझिस्टन्स अ‍ॅण्ड फ्रेश चॅलेंज इन पोस्ट-2019 काश्मीर (2019 नंतर काश्मीरमध्ये प्रतिकार व आव्हान) असा होता. लेखक, कवी व कार्यकर्ते अथर झिया या परिसंवादमध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलणार होते. या कार्यक्रमाला विरोध करताना दिल्लीतील एका वकिलाने जेएनयूच्या महिला अभ्यास केंद्र व परिसंवाद आयोजकांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.या परिसंवादाच्या विषयावर आक्षेप घेत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या विषयामुळे देशाचे सार्वभौमत्व व अखंडतेवर प्रश्न उपस्थित होते आहे. हा कार्यक्रम काश्मीरकडे लक्ष वेधून त्याविरुद्ध महिलांच्या प्रतिकारासाठी एक रूपरेषा तयार करेल. हा अतिशय आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर विषय होता. जेएनयू हे अशा वेबिनारसाठी व्यासपीठ असू शकत नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे, असे एम. जगदेशकुमार यांनी सांगितले. हे प्रकरण समोर आल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

JNU’s attempt to ignite Kashmir issue thwarted, seminar canceled after lawyer’s complaint

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात