विशेष प्रतिनिधी
तळेगांव शापंत : वर्धा जिल्ह्यातील तळेगांव येथील आष्टी टी पॉईंट येथे असलेल्या एका हॉटेलमध्ये चक्क कार घुसली. ₹या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे.Full Speed car Entered the hotel in Vardha district
या अपघातात कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. नागपूर येथून अमरावतीकडे जात असतांना MH 05 AJ 2090 ही होंडा सिटी कार तळेगाव येथील आष्टी टी पॉईंट वर असलेल्या हॉटेलमध्ये घुसून पुन्हा फिरली. ज्यामध्ये हॉटेलचे मोठे नुकसान झाले. हॉटेलचे शटर सुद्धा तुटले. हॉटेलमध्ये बसण्याकरिता शेड होते ते सुद्धा पूर्ण तुटले आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारने धडक दिल्यानंतर शटर तोडून पूर्ण कार फिरली.
– तळेगावच्या आष्टी टी पॉईंट येथील दुर्घटना – भरधाव कार चक्क हॉटेलमध्ये घुसली – कार नागपूर येथून अमरावतीकडे जात होती – मंगळवारी कारची हॉटेलच्या शटरला जोरदार धडक – हॉटेलचे शटर, शेड तुटले, मोठे नुकसान
https://youtu.be/n-CbPebIn7g
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App