मुंबईच्या सराफाचे तब्बल सव्वा कोटींचे 3 किलो सोने लंपास

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील सराफी व्यावसायिकांना सोने पुरविण्यासाठी आलेल्या मुंबईच्या व्यापाऱ्याकडील सव्वा कोटींचे 3 किलो 139 ग्राम सोने लंपास करण्यात आल्याची घटना रविवार पेठेत घडली.Mumbai’s gold bullions 1,25 crore rupees gold stolen

एका सराफी दुकानात व्यापाऱ्याशी बोलत असताना तेथे खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन महिलांनी डल्ला मारत हा ऐवज लांबवला. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

 



 

याप्रकरणी जिग्नेश बोराना (वय 33) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसानी दोन महिलांसह एका लहान मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोराना यांचा सोन्याचा व्यवसाय आहे. ते विविध जिल्हे आणि शहरातील सराफी व्यापाऱ्यांना सोने पुरवितात. शनिवारी दुपारी ते मुंबईवरून पुण्यात आले.

त्यांचे नेहमीचे ग्राहक असलेल्या रविवार पेठेतील सराफी मित्राच्या दुकानावर जाऊन ते व्यवसायाची बोलणी करीत होते. त्यांनी त्यांची पांढऱ्या रंगांचे प्लास्टिक बॉक्स जवळच ठेवलेले होते. या बॉक्समध्ये 3 किलो 139.40 ग्रॅम सोने होते.

त्यांच्या गप्पा सुरु असतानाच या दुकानात खरेदीसाठी दोन महिला व लहान मुलगा आला होता. त्यांनी व्यापाºयांचे लक्ष नसल्याची संधी साधत सव्वातीन किलो सोने असणारा बॉक्स लंपास केला आहे.

Mumbai’s gold bullions 1,25 crore rupees gold stolen

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात