हरिद्वार येथे झालेल्या महाकुंभमेळ्यात ४९ लाख भाविकांनी हजेरी लावल्याचे म्हटले जात होते. मात्र, उत्तराखंड सरकारने केलेल्या सविस्तर अभ्यासात केवळ १५ लाख भाविकच हरिद्वार आले होते असे स्पष्ट झाले आहे. कोरोना संकटाने देशात हाहाकार उडवलेला असताना हरिद्वारमध्ये महाकुंभमेळा आयोजित करण्यात आला होता.Only 15 lakh people attended the Kumbh Mela, the Uttarakhand government clarified after a study
विशेष प्रतिनिधी
हरिद्वार : हरिद्वार येथे झालेल्या महाकुंभमेळ्यात ४९ लाख भाविकांनी हजेरी लावल्याचे म्हटले जात होते. मात्र, उत्तराखंड सरकारने केलेल्या सविस्तर अभ्यासात केवळ १५ लाख भाविकच हरिद्वार आले होते असे स्पष्ट झाले आहे.
कोरोना संकटाने देशात हाहाकार उडवलेला असताना हरिद्वारमध्ये महाकुंभमेळा आयोजित करण्यात आला होता. यावरून उत्तराखंड उच्च न्यायालयाने राज्यावर ताशेरेही ओढत कुंभमेळ्याचे आयोजन ही चूक असल्याचे म्हटले होते.
उत्तराखंड सरकारने आपल्या अधिकृत आकडेवारीनुसार १२ ते १४ एप्रिल या पवित्र दिवशी ४९ लाख भाविकांनी गंगेमध्ये स्नान केल्याचे म्हटले होते. त्यामुळे सरकारने आणि विरोधकांनीही टीका केली होती.
परंतु, उत्तराखंड सरकारने त्यानंतर केलेल्या तपासात ४९ लाख नव्हे तर त्याच्या ७० टक्के म्हणजे १५ लाख लोकच आले होते असे म्हटले आहे.उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक संजय गुंज्याल म्हणाले, १२ एप्रिल रोजी २१ लाख भाविक गंगास्रानासाठी आले होते. १३ एप्रिल रोजी तीन लाख तर १४ एप्रिल रोजी १२ लाख भाविक आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App