कुंभमेळ्यातील साधू प्रसादासारखा कोरोना वाटतील; मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांच्या वक्तव्यावरून वाद


विशेष प्रतिनिधी

मुंबई – मुंबईतला कोरोना फैलाव आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊनचा पर्याय निवडावाच लागेल, असे सांगत असताना मुंबईच्या महापौर नवा वाद निर्माण करून बसल्यात. त्यांनी कुंभमेळ्यातील साधूंबाबत वादग्रस्त विधान केले आहे. mumbai mayor kishori pednekar creates contraversy over remarks on sadhus

कुंभमेळ्यातील साधू हरिव्दारहून जिथे जातील तिथे प्रसादासारखा कोरोना वाटतील, असे विधान महापौर किशोरी पेडणेकर यांनी केल्याने हा वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियातून त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. प्रसाद या शब्दावर नेटकऱ्यांचा आक्षेप आहे.

मुंख्यमंत्र्यांनी कलम १४४ संचारबंदी नियम संपूर्ण महाराष्ट्रात लागू केले पण तरीही कोरोना आटोक्यात येताना दिसत नाही. यावरच किशोरी पेडणेकर यांनी शहराच्या प्रथम नागरिक म्हणून आपली भूमिका मांडली आहे. कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहाता संपूर्ण लॉकडाऊन लागू करायला हवा, अशी सूचना किशोरी पेडणेकर यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन लागू केल्यानंतर विरोधी पक्षांनी लॉकडाऊनवर मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे.

मुंबईतल्या ५ टक्के बेजबाबदार नागरिकांमुळे उरलेल्या ९५ टक्के नागरिकांना अडचण होत असल्याची टीका पेडणेकर यांनी केली. त्या म्हणाल्या की, “९५ टक्के मुंबईकर कोरोना नियमावलीचे पालन करतात. पण ५ टक्के लोक निर्बंधांचे पालन करीत नाहीत. त्यांच्यामुळे इतरांना अडचण होते आणि कोरोनाचा धोका वाढतो. यासाठीच सध्याची परिस्थिती पाहाता संपूर्ण लॉकडाऊन लागू करायला हवा.

mumbai mayor kishori pednekar creates contraversy over remarks on sadhus

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात