वृत्तसंस्था
पणजी : ऑक्सिजनअभावी गोव्यात चार दिवसांत तब्बल 75 कोरोना रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला आहे. In Goa due to lack of Oxygen 75 persons died
गोवा मेडिकल कॉलेजमध्ये मंगळवारपासून हे मृत्यूसत्र सुरू झाले. पहाटे 2 ते सकाळी 6 च्या दरम्यानच हे मृत्यू झाल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. मंगळवारी 26, बुधवारी 21, गुरुवारी 15 आणि शुक्रवारी 13 मृत्यू झाले.
ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप होत आहेत. उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणीदरम्यान एक्स्पर्ट ड्रायव्हर नसल्याने ऑक्सिजनची वाहतूक करण्यात अडचणी येत आहेत, असा दावा गोवा सरकारने केला होता. तेव्हा न्यायालयाने सरकारची खरडपट्टी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App