सावरकरांची यथेच्छ बदनामी करणाऱ्या ‘द विक’चा माफीनामा; सावरकरांबद्दल नितांत आदर असल्याचे जाहीर निवेदन! पण लेखक निरंजन टकले मात्र माफीसाठी राजी नाहीत


विशेष प्रतिनिधी

मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची बदनामी करणारा लेख २०१६ मध्ये प्रसिद्ध करणाऱ्या “द विक” साप्ताहिकाने माफी मागितली आहे. सावरकरांविषयी “द विक”ला अतिशय आदर आहे. आम्ही छापलेल्या लेखामुळे जर कोणी दुखावले गेले असेल, तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, अशी चौकट “द विक”ने संपादकांचे नाव न छापता प्रसिद्ध केली आहे. मात्र, हे प्रकरण एवढ्यावरच संपणार नसल्याचेही स्पष्ट होत आहे. कारण संबंधित लेखाचे लेखक – पत्रकार निरंजन टकले हे लेखातील मतांवर ठाम आहेत आणि माफी मागण्यास राजी नाहीत. The Week says it holds Savarkar in ‘high esteem’, apologises for a 2016 article, niranjan takle still adament

“वीर सावरकरांविषयी द विकला अतिशय आदर आहे. Lamb lionized हा लेख आम्ही २४ जानेवारी २०१६ ला प्रसिध्द केला होता. त्यात Hero to Zero असा कंटेटही होता. मात्र, त्यातून वीर सावरकरांविषयी गैरसमज परसरले आणि त्यातून गैरअर्थ निघत होते. वीर सावरकरांविषयी आम्हाला अतिशय आदर आहे. जर त्या लेखामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, आम्ही द विकची मॅनेजमेंट त्या लेखाविषयी दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो,” अशी ही चौकट आहे. या चौकटीला शीर्षक दिलेले नाही. २३ मे २०२१ च्या अंकात ही चौकट प्रसिद्ध करण्यात आली आहे.काय आहे प्रकरण…

हे संपूर्ण प्रकरण द विकमध्ये २४ जानेवारी २०१६ च्या अंकातील निरंजन टकले यांच्या लेखामुळे सुरू झाले. Lamb lionised या शीर्षकाने हा लेख द विकने प्रसिद्ध केला होता. कोकराला सिंहाचे कातडे चढविले असा त्याचा मराठीत अर्थ होतो. निरंजन टकले हे कार्ड होल्डर कम्युनिस्ट आहेत. त्यांनी सावरकरांच्या general clemency चा माफीनामा असा अर्थ लावत सावरकरांनी माफी मागून अंदमानातून सुटका करवून घेतल्याचा अर्थ लावला आणि लेख प्रसिद्ध केला. यामध्ये काही ब्रिटिश कागदपत्रांचा आधार घेतल्याचाही दावा टकले यांनी केला आहे. पण हा लेख छापताना लेखक आणि द विकने कोठेही सावरकरांचे स्वतःचे नेमके म्हणणे काय आहे किंवा त्यांनी आत्मचरित्रात याविषयी नेमके काय म्हटले आहे, याची दखलही घेतली नाही. उलट Hero to Zero अशी चौकट छापून सावरकरांविषयी अनेक तथ्यहीन बाबीही छापल्या.

या विरोधात सावरकरांचे पुतणे रणजित सावरकर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. आता निरंजन टकले हे द विक चे पत्रकार राहिलेले नाहीत. तसेच त्या वेळचे संपादक टी. आर. गोपालकृष्णन हे देखील आता द विकच्या सेवेत नाहीत. त्यामुळे द विकचे एड़िटर इन चार्ज व्ही. एस. जयेसचंद्रन यांनी out of court settlement चा प्रयत्न करून द विकने माफी मागावी असे सूचविले आहे. त्यानुसार द विकने संपादकांचे नाव न छापता नुसती माफीची चौकट छापली आहे.

मात्र, याबाबत रणजित सावरकरांनी संबंधितांना शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. तर निरंजन टकले यांनी द विकच्या नव्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याचवेळी आपण ही केस कोर्टात लढून जिंकू, असा दावाही केला आहे.

The Week says it holds Savarkar in ‘high esteem’, apologises for a 2016 article, niranjan takle still adament

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण