“मी राहुल सावरकर नाही” नंतर “मी नरेंद्र मोदी नाही”; मोदी २४ तास खोटे बोलतात!!, राहुल गांधींची आसाममध्ये शेरेबाजी

वृत्तसंस्था

कामरूप – काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आसामच्या कामरूपच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बेछूट शेरेबाजी केली आहे. मोदी २४ तास खोटे बोलत असतात, मी तुमच्याशी खोटे बोलायला आलेलो नाही कारण माझे नाव नरेंद्र मोदी नाही, अशी शेरेबाजी राहुल गांधींनी केली. I’ve not come here to lie to you. My name isn’t Narendra Modi. He lies to India all 24 hours: Rahul Gandhi in Kamrup

राहुल गांधींनी गेल्या वर्षी दिल्लीतील देश बचाओ रॅलीत अशीच, “मी माफी मागणार नाही, माझे नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे…,” शेरेबाजी केली होती. त्यावरून देशभर प्रचंड राजकीय गदारोळ उठला होता.आज त्याच्या पुढची पायरी गाठत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बेछूट शेरेबाजी केली आहे. राहुल म्हणाले, की मी तुमच्याशी खोटे बोलायला आलेलो नाही. माझे नाव नरेंद्र मोदी नाही. जर तुम्हाला आसाम, शेतकरी आंदोलन किंवा कोणत्याही विषयातले खोटे भाषण ऐकायचे असेल, तर तुम्ही कोणताही टीव्ही चॅनेल लावा. त्यावर तुम्हाला नरेंद्र मोदी खोटेच बोलताना आढळतील. तुम्ही त्यांच्या तोंडाकडे बघत बसा. हवा तेवढा वेळ ऐका. ते २४ तास खोटेच बोलत असतात.

राहुल गांधी यांच्या या बेछूट शेरेबाजीनंतर भाजपमध्ये प्रचंड संताप उसळला असून अनेकांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे. सोशल मीडियातही त्यांच्या या बेछूट शेरेबाजीची चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी नरेंद्र मोदी नव्हे, तर गांधी खानदानाला खोटारडे म्हणून संबोधले आहे.

सीएए आसामी जनतेलाच नकोय

सीएए आम्हाला नकोय, असे आसामच्या जनतेनेच आम्हाला सांगितले म्हणून आम्ही काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सीएए लागू करणार नसल्याचे आश्वासन दिले. सीएए आसामला तोडण्याचा आणि नफरत फैलावण्याचा डाव आहे. तो तुमच्या इच्छेने आम्ही आसाममध्ये लागू करू देणार नाही, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.

नोटबंदी आणि जीएसटी लागू नरेंद्र मोदींनी छोटे उद्योग, छोटे व्यापारी, व्यावसायिक यांना करोडो रूपयांना लुटले आणि त्यांचा पैसा दोन – तीन बड्या उद्योगपतींचे खिसे भरले. जे काही सामान्य जनतेचे होते, ते सगळे मोदींनी लुटून आपल्या मित्रांना बड्या उद्योगपतींच्या हातात सोपविले, असा आरोप राहुल गांधी यांनी नलबारीच्या सभेत केला आहे.

I’ve not come here to lie to you. My name isn’t Narendra Modi. He lies to India all 24 hours: Rahul Gandhi in Kamrup

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*