इंग्लडच्या शाही खानदानाविषयी जगभरातील प्रत्येकाच्याच मनात कुतुहल असते. पंजाबमधील एका महिलेने चक्क प्रिन्स हॅरीने आपल्याला लग्नाचे वचन दिले होते. वचन मोडल्याबद्दल त्याला अटक करा अशी मागणी केली. हॅरी जणू पंजाबमधील सायबर कॅफेमध्ये बसला होता असे म्हणत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.The woman said Prince Harry had promised to marry her, the court said yes, he must have been sitting in a cyber cafe in Punjab!
विशेष प्रतिनिधी
अमृतसर : इंग्लडच्या शाही खानदानाविषयी जगभरातील प्रत्येकाच्याच मनात कुतुहल असते. पंजाबमधील एका महिलेने चक्क प्रिन्स हॅरीने आपल्याला लग्नाचे वचन दिले होते. वचन मोडल्याबद्दल त्याला अटक करा अशी मागणी केली.
हॅरी जणू पंजाबमधील सायबर कॅफेमध्ये बसला होता असे म्हणत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.पंजाब उच्च न्यायालयात या विचित्र प्रकाराची सुनावणी झाली. एका महिलेने न्यायालयात याचिका दाखल करून प्रिन्स हॅरीला अटक करावी अशी मागणी केली.
हॅरीने आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाचे वचन दिले होत असे या महिलेचे म्हणणे आहे. मात्र, हा सोशल मीडिया स्कॅमचा प्रकार असल्योच सांगत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने सांगितले की, सगळ्यांनाच माहिती आहे
की लोक फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियावर बनावट अकाऊंट बनवितात. त्यामुळे या बनावट आयडीच्या संदर्भातील कोणत्याही संवादाला न्यायालयात पुरावा म्हणून सादर केले जाऊ शकत नाही. शक्यता आहे की हा कथित प्रिन्स हॅरी पंजाबमधीलच एखाद्या गावातील सायबर कॅफषमध्ये बसून मजा बघत असेल.
संबंधित महिलेने दाखले केलेल्या याचिकेला कोणताही आधार नाही. परंतु, न्यायालय या महिलेप्रति सहानुभूतीपूर्वक विचार करत आहे. कदाचित या कथित प्रिन्स हॅरीवर या महिलेने विश्वास ठेवून त्याचे बोलणे खरेही मानले असेल. परंतु, हे दिवास्वप्न पाहिल्यासारखे आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
या महिलेने याचिकेमध्ये कथित प्रिन्स हॅरीचे ई-मेलही जोडले होते. त्यामध्ये प्रिन्सने महिलेसोबत लग्न करण्याचे वचन दिले होते. मात्र, न्यायमूर्ती अरविंद सिंह सांगवान म्हणाले, प्रिन्स हॅरीसोबत लग्न करण्याची कल्पना म्हणजे दिवसा स्वप्न पाहण्यासारखीच आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App