पंजाबमधील भाजपा आमदारांचा कॉँग्रेस प्रवेश ही अफवाच, सोशल मीडियावरील खोडसाळपणा

पंजाबच्या सर्वच्या सर्व तीनही भाजपा आमदारांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची पोस्ट फिरत आहे. मात्र, हा दावा पूर्णपणे चुकीचा असून पंजाबमध्ये भाजपाचे दोन आमदार असून ते पक्षासोबतच असल्याचे स्पष्ट झाले आहे. The entry of BJP MLAs from Punjab into the Congress is a rumor, a hoax on social media


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंजाबच्या सर्वच्या सर्व तीनही भाजपा आमदारांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची पोस्ट फिरत आहे. मात्र, हा दावा पूर्णपणे चुकीचा असून पंजाबमध्ये भाजपाचे दोन आमदार असून ते पक्षासोबतच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शेतकºयांच्या आंदोलनावरून पंजाबमध्ये असंतोष पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून पंजाबच्या भाजपाच्या तीनही आमदारांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता पंजाब भाजपामुक्त आहे, असा दावा करणारी पोस्ट व्हायरल झाली होती. मात्र, हा खोडसाळपणा असल्याचे स्पष्ट झाले आहे.पंजाब विधानसभेच्या वेबसाईननुसार सध्या तेथे अरुण नारंग आणि दिनेश सिंग हे दोन भाजपा आमदार आहेत. नारंग यांनी आपण भाजपा सोडल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. हा खोडसाळपणा असल्याचे सांगून नारंग म्हणाले, पंजाबमध्ये भाजपाचे दोन आमदार आहेत, तीन नाहीत हे पोस्ट व्हायरल करणाऱ्याला समजायला हवे होते. २०१७ मध्ये भाजपाचे तीन आमदार होते.

मात्र, सोमप्रकाश यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढविली आणि ते केंद्रीय मंत्री झाले. त्यांच्या फागवारा विधानसभेच्या जागेवर मात्र भाजपाचा पराभव झाला. त्यामुळे भाजपाचे दोनच आमदार आहेत. २०१७ मध्ये भाजपाची अकाली दलासोबत युती होती. त्यामुळे मुळात भाजपाचे जागाच कमी लढविल्या होत्या. पंजाब कॉँग्रेसनेही भाजपा आमदारांना प्रवेश दिल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.

The entry of BJP MLAs from Punjab into the Congress is a rumor, a hoax on social media

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*