मराठी पगल्या चित्रपटाचा मॉस्कोमध्ये डंका, सर्वोत्तम परदेशी भाषा चित्रपटाचा पुरस्कार


लॉकडाऊनमुळे प्रदर्शित होऊ न शकलेला मराठी चित्रपट पगल्याने मॉस्कोमध्ये आपला डंका वाजविला आहे. मास्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2021 मध्ये पगल्या चित्रपट सर्वोत्तम परदेशी भाषा कॅटेगरीमध्ये अव्वल ठरला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : लॉकडाऊनमुळे प्रदर्शित होऊ न शकलेला मराठी चित्रपट पगल्याने मॉस्कोमध्ये आपला डंका वाजविला आहे. मास्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2021 मध्ये पगल्या चित्रपट सर्वोत्तम परदेशी भाषा कॅटेगरीमध्ये अव्वल ठरला आहे. Marathi Film Pagalya Best Foreign Language Film Award in Moskow

दहा वर्षांचे दोन चिमुकले मित्र आणि त्यांचा छोटा कुत्रा अशी या सिनेमाची कहाणी आहे. विनोद सॅम पीटर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. सुनील प्रल्हाद खराडे कथा यांनी लिहिली आहे.



आपल्या चित्रपटाचा सर्वोच्च सन्मान झाल्यामुळे भारावून गेलेले विनोद पीटर म्हणाले, आमच्या कथेला दाद मिळते हे पाहून आनंद होत आहे. मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळणं हे माज्यासाठी आणि संपूर्ण टीमसाठी अभिमानाची बाब आहे.

पगल्या ही ऋषभ आणि दत्ता या दोन मुलांची ही कथा आहे. दहा वर्षाच्या आसपास वयोगटातील हे दोघे आहेत, त्यांच्याभोवती चित्रपटातील कथानक फिरतं. एक शहरातील तर एक खेड्यातील असे हे मित्र. एका मित्राचं हरवलेलं कुत्र्याचं पिल्लू दुसऱ्या ला सापडतं आणि ते कसे मित्र बनत गेले, ही साधी, सरळ पण प्रत्येकाला आपली वाटणारी ही कहाणी आहे.

या सिनेमाला कॅलिफोर्नियातील लॉस वर्ल्ड प्रीमियरमध्येही गौरवण्यात आलं. याशिवाय लंडन, इटली, स्वीडन, ऑस्ट्रेलिया , फिलिपाईन्स, तुर्की, इराण, अर्जेंटिना, लेबनन, बेलारुस, रशिया, कझाकिस्तान, इज्रायल, अमेरिका आणि कॅनडामध्ये विविध फिल्म फेस्टिव्हल्समध्ये सन्मान मिळवले आहेत.

Marathi Film Pagalya Best Foreign Language Film Award in Moskow


विशेष बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात