अजितदादांच्या अपघाताची चौकशी झालीच पाहिजे; शिवसेनेचीही मागणी : उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

विशेष प्रतिनिधी

बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुरुवातीला हा अपघात असल्याचे सांगितले होते. मात्र, आमदार रोहित पवार यांच्याकडून सातत्याने या घटनेबाबत संशय व्यक्त केला जात असून घातपाताची शक्यताही उपस्थित केली जात आहे. मग शरद पवार यांनी सुरुवातीला मांडलेली भूमिका आणि रोहित पवार यांची सध्याची भूमिका वेगळी का आहे, असा सवाल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित केला. Uday Samant


गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिवसा’चा भव्य सोहळा; गडचिरोली 100 टक्के नक्षलमुक्त होऊन ‘स्टील सिटी’ म्हणून पुढे येत आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


पुणे जिल्ह्याच्या संघटनात्मक दौऱ्यानिमित्त गुरुवारी (ता. १९) उद्योग मंत्री उदय सामंत व सचिन अहिर बारामतीत आले होते. Yaveb सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, अजितदादांच्या अपघाताची चौकशी झालीच पाहिजे, अशी शिवसेनेचीही भूमिका आहे. चौकशीचा अहवाल लवकरात लवकर राज्यासमोर आला पाहिजे. अजितदादांच्या अपघाताच्या दिवशीच शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. त्यांनी हा अपघात असल्याचे सांगितले होते. असे असताना रोहित पवार सातत्याने या घटनेबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित करीत आहेत. त्यामुळे रोहित पवार असे का करीत आहेत, हे त्यांनाच विचारले पाहिजे, असे सामंत म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांच्यावर बोलण्याइतका मी मोठा नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. रोहित पवार यांना मी कसे थांबवू शकतो, असेही सामंत स्पष्ट केले. या अपघाताच्या चौकशीची मागणी शिवसेनेनेही यापूर्वी केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात भूमिका मांडली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अपघाताच्या चौकशीचा विषय आणि त्या घटनेचे राजकारण करणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. अपघाताची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे; मात्र त्यावर राजकारण करणे योग्य नाही, असे सामंत यांनी सांगितले.

There must be an inquiry into Ajitdada’s accident; Shiv Sena also demands the same: Uday Samant’s clarification

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात