सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबतच मांडीला मांडी; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Eknath Shinde

विशेष प्रतिनिधी

मुंबई: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा पुस्तकातून अपमान करण्यात आल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील आक्षेपार्ह मजकुराचा निषेध म्हणून शिवसेनेने ती पाने फाडल्याचे सांगत, सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्यांसोबत सत्तेत बसणाऱ्या आणि स्वतःला सावरकरवादी व हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असे थेट आव्हान एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिले आहे.

ही बौद्धिक दिवाळखोरी आणि कोणती मर्दुमकी?; काँग्रेसवर थेट निशाणा

माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सोनिया गांधी यांच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारी दोन पाने आहेत. यापूर्वीही राहुल गांधी यांनी सावरकरांना वारंवार ‘माफीवीर’ संबोधून त्यांचा अवमान केला असून जाणीवपूर्वक त्यांची बदनामी करण्याचे काम काँग्रेसकडून सुरू आहे. सावरकरांनी देशासाठी केलेले कार्य आणि त्यांनी भोगलेल्या यातना सर्वश्रुत आहेत; अशा महान स्वातंत्र्यसैनिकाचा वारंवार अपमान करणे ही बौद्धिक दिवाळखोरी असून ही कोणती मर्दुमकी आहे, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना देशातील जनतेने तीन वेळा नाकारून निवडणुकीत घरी बसवले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.


गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिवसा’चा भव्य सोहळा; गडचिरोली 100 टक्के नक्षलमुक्त होऊन ‘स्टील सिटी’ म्हणून पुढे येत आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


बाळासाहेबांच्या स्मृतिदिनावरून काँग्रेसची दुटप्पी भूमिका उघड

सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत राहून विरोधकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तडजोड केल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचे दैवत असून त्यांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या सूत्रावर आमची शिवसेना पुढे जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त काँग्रेसच्या नेत्यांनी एकही ट्विट किंवा श्रद्धांजली व्यक्त केली नाही, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. इंडिया आघाडीत एकत्र असताना बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाला श्रद्धांजली न देणे आणि तरीही त्यांच्यासोबत राजकीय संबंध ठेवणे, ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका त्यांनी केली.

शायना एनसी यांच्या फोटो प्रकरणावर स्पष्टीकरण आणि आंदोलनाचा इशारा

दरम्यान, शिवसेना नेत्या शायना एनसी यांच्या संदर्भातील बाळासाहेब ठाकरे यांच्या फाटलेल्या फोटोवरून होत असलेल्या आरोपांनाही एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. संबंधित फोटो हा बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांना चप्पल मारल्याचा असून, त्या फोटोतील फाटलेला भाग हा मणिशंकर अय्यर यांच्या चेहऱ्याचा असल्याचे शायना एनसी यांनी स्पष्ट केले आहे; बाळासाहेबांचा अपमान शिवसैनिक कधीही सहन करणार नाही, असे शिंदे यांनी ठामपणे सांगितले. यापुढेही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांविरोधात शिवसेना आंदोलन करेल, असा इशारा देतानाच राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा शेतकऱ्यांना मदत करणे आणि दुष्काळग्रस्त भागात जाऊन त्यांच्या अडचणी सोडवणे अधिक महत्त्वाचे असल्याचे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

Eknath Shinde Targets Congress Over Alleged Insult to Savarkar in Sonia Gandhi’s Book

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात