विशेष प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 3 ऑक्टोबर 2026 पासून होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2026 आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2026 या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षांच्या सुधारित तारखा नंतर स्वतंत्रपणे जाहीर केल्या जाणार आहेत.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025च्या मूल्यांकनाबाबत विद्यार्थी आणि विविध विद्यार्थी संघटनांकडून आक्षेप नोंदवण्यात आले होते. हे आक्षेप विचारात घेऊन आयोगाने या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 2025च्या परीक्षेची पुढील प्रक्रिया लांबण्याची शक्यता असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप
शासकीय भरती प्रक्रियेतील विविध प्रश्नांबाबत आदित्य ठाकरे यांनी 11 सप्टेंबर 2026 रोजी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट घेतली होती. या भेटीत परीक्षार्थींच्या समस्या आणि तक्रारी राज्यपालांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या होत्या. यानंतर 25 सप्टेंबर रोजी आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र देऊन परीक्षार्थींच्या मागण्यांबाबत पुन्हा निवेदन केले होते. सध्याच्या परिस्थितीत MPSC च्या कार्यपद्धतीबाबत तसेच आयोगाच्या अध्यक्षांबाबत परीक्षार्थींच्या मनात अविश्वासाचे वातावरण असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले होते.
परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आभार मानले. परीक्षार्थींच्या मागण्यांची दखल घेत राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रमुखांचा राजीनामाही तात्काळ घेतला जाईल, अशी आशा व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App