SIR वरून NDAमध्येच वेगळा सूर? चिराग पासवान, उपेंद्र कुशवाह अन् चंद्रबाबूंच्या पक्षाने ECला घेरलं

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवर (SIR) आणि निवडणूक आयोगातील कथित अंतर्गत मतभेदांवरून सुरू असलेल्या वादाला आता नवे राजकीय वळण मिळाले आहे. विरोधकांपाठोपाठ केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (NDA) काही घटक पक्षांनीही निवडणूक आयोगाकडून अधिक स्पष्ट आणि सविस्तर स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.
केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)चे प्रमुख चिराग पासवान, राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह आणि तेलुगू देसम पक्षाच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्वतः पुढे येऊन उपस्थित प्रश्नांवर भूमिका स्पष्ट करावी, असे म्हटले आहे. Chirag Paswan

चिराग पासवान यांनी निवडणूक आयोग ही स्वतंत्र घटनात्मक संस्था असल्याचे नमूद करत सरकारचा घटक पक्ष म्हणून आयोगाचा बचाव करण्याची आपली भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. निवडणूक प्रक्रियेवरच नागरिकांचा संशय निर्माण झाला, तर ती गंभीर बाब ठरेल, असे ते म्हणाले.


‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप


“आयोगाने आपली भूमिका राहुल गांधी किंवा अन्य विरोधी नेत्यांसाठी नव्हे, तर देशातील मतदारांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी स्पष्ट केली पाहिजे,” अशी भूमिका पासवान यांनी मांडली.
तेलगू देशमकडूनही निवडणूक आयोगाने अधिक स्पष्ट माहिती दिल्यास निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास मजबूत होईल, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. राष्ट्रीय लोक मोर्चाचे उपेंद्र कुशवाह यांनीही निर्माण झालेल्या प्रश्नांवर आयोगाने पारदर्शकपणे उत्तर देणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी ऑक्टोबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत मतदार याद्यांशी संबंधित काही निर्णयांवर किमान १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले होते. नव्या मतदारांची नोंदणी, मतदारांची नावे वगळणे आणि SIR प्रक्रियेतील काही निर्णयांवर हे आक्षेप असल्याचे वृत्तात म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने मात्र अंतर्गत मतभेदांबाबतच्या दाव्यांवर स्पष्टीकरण देताना बहुसदस्यीय घटनात्मक संस्थेमध्ये वेगवेगळी मते व्यक्त होणे ही सामान्य प्रक्रिया असल्याचे म्हटले आहे.
आयोगाच्या म्हणण्यानुसार, अंतर्गत चर्चा आणि मतभिन्नता ही निर्णय प्रक्रियेचा भाग असली तरी अंतिम निर्णय एकमताने घेण्यात आले आहेत. आयोगाने अंतर्गत ‘checks and balances’ ही नियमित संस्थात्मक प्रक्रिया असल्याचेही स्पष्ट केले आहे.

विरोधकांचा दबाव कायम

दरम्यान, काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी SIR प्रक्रियेवर आणि आयोगातील कथित मतभेदांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका केली आहे. काही विरोधी नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची तसेच SIR प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली आहे.

आता NDA मधील घटक पक्षांनीही आयोगाकडून खुलासा मागितल्याने हा वाद केवळ सत्ताधारी विरुद्ध विरोधक इतकाच मर्यादित राहिलेला नाही.

Divergent views within the NDA ove r the SIR? Chirag Paswan, Upendra Kushwaha, and Chandrababu’s party corner the EC.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात