बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी राजा आणि वजीरालाच हात घातला, पण दिल्लीतल्या की…??

Pawar

नाशिक : बुद्धिबळाचा पट समोर येताच शरद पवारांनी राजा आणि वजीरालाच हात घातला, पण त्यामुळे तो दिल्लीतल्या वगैरे हात घातला की गल्लीतल्या वजीराला हात घातला??, असा सवाल समोर आला. त्याचे उत्तरही लगेच मिळाले.

शरद पवारांनी पुण्याहून बारामतीला जाताना सुपे गावातल्या विद्या प्रतिष्ठानच्या शाळेला भेट दिली. तिथे त्यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. शाळेतील पदाधिकाऱ्यांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी करत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती शरद पवारांना दिली. अनेक उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. त्यावेळी काही विद्यार्थिनी त्यांच्यासमोर बुद्धिबळाचा पट घेऊन आल्या. बुद्धिबळाचा पट समोर येताच शरद पवारांनी थेट राजा आणि वजीरालाच हात घातला. याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला. त्यामुळे मराठी माध्यमांनी शरद पवारांनी बुद्धिबळाच्या पटावर खेळी करून राजा आणि वजीराला हात घातल्याची बातमी केली. यातून शरद पवार बुद्धिबळाच्या पटावर फक्त राजा आणि वजीरच हलवतात किंवा त्यांना गारद करतात, अशी प्रतिमा निर्मिती केली.



– दिल्लीतले राजा आणि वजीर हलवायची अपेक्षा अपूर्ण

पण ज्या शरद पवारांकडून दिल्लीतल्या राजा आणि वजीराला हात घालण्याची अपेक्षा त्यांच्या समर्थकांनी ठेवली होती, ती त्यांना कधीच पूर्ण करता आलेली दिसली नाही. शरद पवारांना फक्त गल्लीतल्या राजा आणि वजीरालाच हात घालता आला. शरद पवारांनी अनेकदा गल्लीतल्याच राजा आणि वजीरांना गल्लीतल्या गल्लीत गारद केल्याचे दिसले. त्यापलीकडे दिल्लीतल्या राजा आणि वजीरांनी शरद पवारांना कायम‌ गारद केल्याचे दिसले. पण म्हणून पवार आणि त्यांच्या समर्थकांनी “राजा आणि वजीर हलवणारे शरद पवार” या प्रतिमेला धक्का लागू दिला नाही.

म्हणूनच शरद पवारांनी बारामती तालुक्यातल्या सुपे गावातल्या शाळेला भेट देऊन बुद्धिबळाच्या पटावरचा राजा आणि वजीर हलवले, त्याची सुद्धा मराठी माध्यमांनी बातमी केली. पण शरद पवारांना दिल्लीतले राजा आणि वजीर कधी हलवता आले नाहीत. गारद करता आले नाहीत, हे राजकीय सत्य मात्र मराठी माध्यमांनी कधी खुल्या मनाने सांगितले नाही.

As soon as the chessboard was placed before him, Pawar reached straight for the King and the Queen

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात