प्रियांका गांधींचा मतदारसंघ वायनाडमध्ये पुन्हा एकदा भूस्खलन; प्रियांका गांधींचे दिल्लीतून ट्विट!!

Priyanka Gandhi

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : प्रियांका गांधींचा केरळ मधला लोकसभेचा मतदारसंघ वायनाड मध्ये मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा भूस्खलन झाले आहे. त्यामुळे अनेक लोकांना आपापल्या घरांमधून विस्थापित व्हावे लागले आहे. केरळचे काँग्रेस सरकार केरळ मधले काँग्रेसचे सरकार मदत आणि बचाव कार्यासाठी पुढे आले आहे. पण स्वतः प्रियांका गांधी यांनी दिल्लीतूनच एक ट्विट केले आहे.

वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी नमूद केले, की “वायनाड मध्ये भूस्खलनामुळे अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन स्वतः मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. पोलीस आणि एनडीआरएफ (NDRF) ची पथके काही काळापासून घटनास्थळी दाखल झाली आहेत, तसेच एसडीआरएफ (SDRF) ची पथके आणि नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवकही तिथे पोहोचले आहेत.

आम्ही सर्वजण जिल्हा प्रशासन, तिरुवनंतपुरमवरून येत असलेले मंत्री टी. सिद्दीक आणि ए. पी. अनिल कुमार, तसेच स्थानिक पक्ष पदाधिकारी आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत आहोत. ज्यांनी आपल्या कुटुंबातील प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रती मी मनापासून शोक व्यक्त करते. या अत्यंत कठीण काळात आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि शक्य ती सर्व मदत देऊ. ज्यांचा अद्याप शोध लागलेला नाही, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत आणि आशा बाळगत आहोत; बचाव पथके त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी धैर्याने परिस्थितीचा सामना करावा आणि त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रियजनांना या वेदनादायी क्षणी हिंमत मिळो, असेही प्रियांका गांधींनी या ट्विटमध्ये नमूद केले.

Landslide once again in Priyanka Gandhi’s constituency Wayanad

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात