Uddhav Thackeray : तुझ्यावरील गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? हा वाघचा कातडं पांघरलेला लांडगा निघाला, उद्धव ठाकरेंचा निंबाळकरांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Uddhav Thackeray  महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून शिवसेनेत दुसरे सर्वात मोठे बंड पाहायला मिळाले असून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे 6 खासदार फोडून त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे. शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना देण्यात आलेला हा दुसरा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर आक्रमक झालेल्या उद्धव ठाकरे यांनी थेट या 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरे सुरू करून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधायला सुरुवात केली आहे. याच दौऱ्याचा भाग म्हणून आज धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडली, ज्यामध्ये संजय राऊत यांनी सर्वप्रथम ओमराजेंवर सडकून टीका करत जोरदार हल्लाबोल केला.Uddhav Thackeray

गद्दाराच्या सभेला मी आलो होतो..

उद्धव ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरे फिरत नाही म्हणतात उद्धव ठाकरे फिरायला लागले की काय होत ते महाराष्ट्र बघतोय. या सभा नाही, या माझ्या कौटुंबिक बैठका आहेत, यांनी कितीही आमदार फोडू दे, तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय मी राहणार नाही. लोकसभा निवडणुकांवेळी, समोरच्यांकडून पैशांचा पाऊस पडत होता, तेव्हा या गद्दारासाठी एका शेतकऱ्याने त्याच्याकडचे पैसे निवडणुकीसाठी दिले. गद्दाराच्या सभेला मी आलो होतो तेंव्हा एक गरीब शेतकरी आला आणि म्हणाला, मला खासदारला पैसे द्यायचे आहेत. काय भाषण काय देत होता… माझा फोन नंबर घ्या म्हणायचा, मी फोन करायला लागलो तर फोन उचलायचा नाही. मग, मी कैलासला म्हणालो अरे हा तर फोन उचलत नाही, असे म्हणत ओमराजे निंबाळकरांवर ठाकरेंनी निशाणा साधला आहे.Uddhav Thackeray



तुझ्यावरील गद्दारीचा शिक्का कसा पुसणार?

पुढे उद्धव ठाकरे सांगतात की, याच एक भाषण होतं, त्या भाषणात तो म्हणाला, खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ म्हटलं तर आपण कोणाचं नाव घेतो. आता, तुझ्यावरील गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? मी जेंव्हा याच्या प्रचारसाठी आलो होतो तेव्हा म्हणालो होतो दोन वाघ माझ्याकडे आहेत. मात्र, त्यातला हा वाघचा कातडं पांघरलेला लांडगा निघाला.

उद्धव ठाकरे म्हणाले, या मिंदेसेनेला भवितव्य काय आहे? मग हे खासदार तिकडे का गेले? कारण भाजपमध्ये गटबाजी सुरू असून त्यांचं ऑपरेशन देवेंद्र सुरु आहे. काही दिवसात देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दुसऱ्या कोणाला दिली तर आश्चर्य वाटणार नाही. देवेंद्र फडणवीस दिल्लीचे स्वप्न पाहत आहेत, संघ सुद्धा पंतप्रधान पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देईल, मग माझं काय होईल यासाठी हे खासदार देवेंद्र फडणवीस यांना न देता बाजूला ठेवले. 2029 पर्यत पंतप्रधानपदाचे जे चेहरे असतील त्यांचा पत्ता कट केला जाईल, अशी टीका ठाकरेंनी केली आहे.

Uddhav Thackeray Slams Rebel MP Omraje Nimbalkar at Dharashiv Rally

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात