विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवून आणणाऱ्या कांजूरमार्ग – बदलापूर मेट्रो १४ प्रकल्पाला आता मोठी गती मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष श्री. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, सुमारे १८००० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आता ईपीसी (Engineering, Procurement and Construction) मॉडेलवर राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग मिळून लाखो नागरिकांचे आधुनिक आणि जलद वाहतुकीचे स्वप्न साकार होईल.
– 43.69 किलोमीटरचा मार्ग
सुमारे ४३.६९ किलोमीटर लांबीची मेट्रो १४ मार्गिका कांजूरमार्ग, घणसोली, महापे, निळजे, शीळफाटा आणि बदलापूर या महत्त्वाच्या भागांना जोडणार आहे. नव्या नियोजनानुसार या प्रकल्पाची उभारणी दोन टप्प्यांत केली जाणार असून, पहिल्या टप्प्यात शीळफाटा ते बदलापूर दरम्यान उन्नत मेट्रो मार्गिका उभारली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शीळफाटा ते कांजूरमार्ग हा महत्त्वपूर्ण भाग विकसित करण्यात येणार आहे.
– ठाणे खाडीखालून भुयारी मार्ग
या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, मेट्रो १४ चा एक महत्त्वाचा टप्पा ठाणे खाडीखालून भुयारी स्वरूपात जाणार आहे. आधुनिक अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना ठरणाऱ्या या मार्गिकेमुळे ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई यांच्यातील संपर्क अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे. तसेच चिखलोली येथे उभारण्यात येणाऱ्या इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हबमुळे मेट्रो ५, मेट्रो १४, रेल्वे आणि रस्ते वाहतूक यांचे एकत्रीकरण होणार असून, प्रवाशांना अखंड आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
मेट्रो १४ पूर्ण झाल्यानंतर बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे पल्याडच्या शहरांतील लाखो नागरिकांना मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईशी थेट, वेगवान आणि आधुनिक कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. प्रवासाचा वेळ कमी होणार, वाहतूक जलदगतीने होणार आणि संपूर्ण पूर्व उपनगरांच्या विकासाला नवी गती मिळणार आहे. मेट्रो १४ ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून मुंबई महानगर प्रदेशाच्या भविष्यातील विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App