काँग्रेस बुडते जहाज आहे, की पवार, ममतांचे दुबळे प्रादेशिक पक्ष बुडते जहाज आहेत??

नाशिक : काँग्रेसमध्ये तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होण्याच्या मुद्द्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चतुराईने शरद पवार किंवा ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधण्याऐवजी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस हे बुडते जहाज असल्यामुळे त्याच्यावर कुणी पाय ठेवणार नाही आणि कुणी पाय ठेवलाच, तर त्याचा भाजपलाच लाभ होईल, असा फडणवीसांनी दावा केला. TMC and NCPsp

एक राजकीय वक्तव्य म्हणून फडणवीस यांनी त्या प्रकारचे बोलणे ठीक आहे, पण फडणवीस जे म्हणाले, ते तंतोतंत खरे आहे आणि त्यात शंभर टक्के तथ्यांश आहे, असे मानायचे काही कारण नाही. किंबहुना फडणवीसांच्या वक्तव्यापेक्षा सत्य काही वेगळेच असू शकते आणि आहे, हे राजकीय वस्तुस्थितीकडे बघितल्यावर लक्षात येते.

– विधानसभांचे निकाल काय सांगतात??

कारण अगदी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांचा आढावा घेतला तरी काँग्रेस हे काही बुडते जहाज नाही. उलट ममता बॅनर्जींची तृणमूळ काँग्रेस, एम. के. स्टालिन यांचा द्रविड मुन्नेत्र कळघम, इडापड्डी पलानीस्वामी यांचा अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अगदी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हेच प्रादेशिक पक्ष बुडत्या बोटी आहेत हे आकडेवारीनिशी स्पष्ट होते. कारण पश्चिम बंगाल, तामिळनाडू या राज्यांमध्ये पराभव होण्याइतपतही काँग्रेस मोठा पक्ष नव्हता. त्या उलट तृणमूल काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळवून या पक्षांचे नामोनिशाण मिटण्याची वेळ बंगाल आणि तामिळनाडू मध्ये आली. काँग्रेसने कम्युनिस्टांचा पराभव करून केरळ जिंकले. कर्नाटक मध्ये यशस्वी पक्षांतर्गत सत्तांतर घडविले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला बुडते जहाज म्हणणे हे अर्धसत्य असल्याचे निदान विधानसभा निवडणुकांच्या निकालांवरून तरी स्पष्ट झाले.



– बंगाल आणि तामिळनाडूतल्या बुडत्या बोटी

त्या उलट ममता बॅनर्जी आणि स्टालिन या दोघांचे पक्ष हरले. त्यामुळे त्यांचेच पक्ष बुडत्या बोटी ठरल्या. ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेस नावाच्या बुडत्या बोटीतून एवढी गळती सुरू झाली, की त्या बोटीत फक्त ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी हे आत्या आणि भातचाच उरतात की काय, अशी स्थिती येऊन ठेपली. एम. के. स्टालिन यांचा पक्ष फुटला नाही, पण त्यांचा पक्ष बुडत्याला काडीचा आधार म्हणून तामिळनाडूच्या राजकारणात तरंगत राहिला. त्या उलट इडापड्डी पलानीस्वामी यांची अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम फुटली आणि त्यांचे आमदार मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्या टीव्ही के पक्षात निघून गेले.

– पवार सगळ्या डावांमध्ये अपयशी

राहता राहिला शरद पवारांचा पक्ष मुळात शरद पवारांनी अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस कब्जात घ्यायचा प्रयत्न केला. त्याला विलीनीकरणाचे गोंडस नाव दिले, पण प्रत्यक्षात तो शरद पवारांचा अजितदादांच्या पक्षावर पूर्ण कब्जा करायचा “डाव” होता, तो भाजपने आणि सुनेत्रा पवारांनी उधळून लावला. त्यामुळे दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण होऊ शकले नाही. आता दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण होतच नाही, आपल्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना सत्तेचे लाभ मिळतच नाहीत, हे पाहून शरद पवारांनी संजय राऊत यांच्या तोंडून राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचे पिल्लू सोडून दिले. म्हणजेच शरद पवारांना स्वतःची राष्ट्रवादी काँग्रेस नीट चालवता आली नाही. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कब्जात घेता आली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मधले १० आमदार आणि आठ खासदार फुटण्याची भीती निर्माण झाली म्हणून शरद पवारांनी काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा “डाव” खेळला. पण याचा अर्थ शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हीच बुडती बोट असल्याचे सिद्ध झाले.

– फडणवीस असे का म्हणाले??

तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस चतुराईने काँग्रेसला बुडते जहाज म्हणाले. कारण दुबळे झालेले प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये शिरले, तरी काँग्रेसची काही अंशी ताकद वाढेल. देशात राष्ट्रीय पातळीवर एक मजबूत काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून उभी राहील आणि याचा भाजपला भविष्यात धोका निर्माण होईल, हे लक्षात घेऊनच फडणवीसांनी चतुराईने काँग्रेसला बुडते जहाज म्हटले, की जेणेकरून काँग्रेस बळकट होऊ नये आणि भविष्यात भाजपला मोठे आव्हान उभे राहू नये!!, यापलीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यातून कुठले राजकीय सत्य बाहेर येऊ शकले नाही.

TMC and NCPsp are sinking boats and not Congress

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात