विशेष प्रतिनिधी
पुणे : Kalyan-Ahilyanagar कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. बेल्हेजवळील गुंजाळवाडी फाटा परिसरात प्रवाशांनी गच्च भरलेली भिवंडी डेपोची एसटी बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याशेजारील खोल खड्ड्यात कोसळली. या दुर्दैवी अपघातात बस चालकासह एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातामध्ये २० प्रवासी गंभीर जखमी झाले असून काही जण थोडक्यात बचावले आहेत.Kalyan-Ahilyanagar
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही भिवंडी डेपोची होती. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने अनेक नागरिक प्रवासासाठी बाहेर पडले होते, ज्यामुळे बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. महामार्गावरून प्रवास करत असताना गुंजाळवाडी फाटा परिसरात अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अवघ्या काही क्षणांत संपूर्ण बस शेजारील खोल खड्ड्यात जाऊन कोसळली. अपघात इतका भीषण होता की बसच्या दर्शनी भागाचा पार चक्काचूर झाला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App