NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना अटक; ‘बायोलॉजी’चे प्रश्न फोडल्याचा आरोप

NEET Paper Leak Case

वृत्तसंस्था

पुणे : NEET Paper Leak Case वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या ‘नीट-युजी 2026’ परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाला आता एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या पुण्यातील मनीषा गुरुनाथ मांढरे या प्राध्यापिकेला दिल्लीतून अटक केली आहे. या अटकेमुळे परीक्षा यंत्रणेतील अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.NEET Paper Leak Case

एनटीएच्या ‘तज्ज्ञ’ पदाचा गैरवापर

मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा मांढरे या पुण्यात वनस्पतीशास्त्र (बॉटनी) विषयाच्या वरिष्ठ प्राध्यापिका म्हणून एका महाविद्यालयात कार्यरत होत्या. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने त्यांची नीट परीक्षेसाठी विषय तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. या पदाचा फायदा घेत त्यांना वनस्पतीशास्त्र आणि प्राणिशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांची पूर्ण माहिती आणि अ‍ॅक्सेस मिळाला होता. मात्र, त्यांनी या गोपनीयतेचा भंग करून परीक्षेची विश्वासार्हता धोक्यात आणली.NEET Paper Leak Case

अशी फुटली प्रश्नपत्रिका

सीबीआयच्या तपासात समोर आले की, एप्रिल 2026 दरम्यान मनीषा मांढरे यांनी पुणे येथील मनीषा वाघमारे (जिच्यावर 14मे रोजी आधीच कारवाई झाली आहे) हिच्या मदतीने काही निवडक परीक्षार्थींना एकत्र केले. मांढरे यांनी आपल्या राहत्या घरी या विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘कोचिंग क्लासेस’ घेतले. या वर्गांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष परीक्षेत येणारे प्रश्न विद्यार्थ्यांना लिहून दिले आणि त्यांच्या पाठ्यपुस्तकात खुणा करून दिल्या. 3 मे 2026 रोजी झालेल्या प्रत्यक्ष परीक्षेतील बहुतांश प्रश्न मांढरे यांनी आधीच दिलेल्या प्रश्नांशी तंतोतंत जुळले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आतापर्यंत 9 आरोपींना अटक

या प्रकरणाच्या संदर्भात सीबीआयने आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून 9 आरोपींना अटक केली आहे. यापैकी 5 आरोपी महाराष्ट्रातील नाशिक, पुणे व अहिल्यानगर येथील रहिवासी आहेत. पुण्यातील रहिवासी असलेल्या पी.व्ही. कुलकर्णी यांची या संपूर्ण कारस्थानाचे सूत्रधार (मास्टरमाइंड) म्हणून ओळख पटली आहे. कुलकर्णी हा लातूरच्या एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीस होता.

नऊ आरोपींपैकी पाच जणांना न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी अटक करण्यात आलेल्या अन्य दोन आरोपींना पुणे न्यायालयाकडून ‘ट्रान्झिट रिमांड’वर दिल्लीला आणण्यात आले आहे. त्यांना सध्या दिल्लीतील एका न्यायालयासमोर हजर केले जात आहे.

गेल्या 24 तासांत, सीबीआयने देशभरातील सहा ठिकाणी छापे टाकले. या कारवाईदरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले. ही जप्त केलेली सामग्री आता तपास यंत्रणेकडून फॉरेन्सिक आणि डिजिटल तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.

आरोपी एकमेकांच्या संपर्कात कसे आले…

1. पी.व्ही. कुलकर्णी (रसायनशास्त्र प्राध्यापक) आणि मनीषा मांढरे (वनस्पतिशास्त्र शिक्षिका): हे दोघे थेट NTA च्या संपर्कात होते. त्यांनी एका कोचिंग इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांना परीक्षेतील प्रश्न उघड केले.

2. मनीषा वाघमारे: तिने या दोन्ही प्राध्यापकांशी संपर्क साधला. तिने त्यांच्याकडून परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळवली आणि कोचिंग इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांना प्रश्न सांगण्यास सुरुवात केली. तसेच, अभ्यासासाठीच्या नोट्स तयार करण्यातही तिने मदत केली. मनीषा वाघमारे ही पुण्याचीच रहिवासी आहे.

3. धनंजय लोखंडे: त्याची मनीषा वाघमारेशी ओळख होती. त्याने तिच्याकडून NEET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित साहित्य मिळवले.

4. शुभम खैरनार: धनंजय लोखंडेने परीक्षेचे प्रश्न शुभम खैरनारकडे पाठवले. 29 एप्रिल 2026 रोजी, शुभमने या प्रश्नांची एक PDF फाईल तयार केली, जी ‘टेलीग्राम’ (Telegram) द्वारे प्रसारित करण्यात आली.

5. यश यादव: शुभमने ती PDF फाईल गुरुग्रामचा रहिवासी असलेल्या यश यादवकडे पाठवली. या बदल्यात त्याला 15 लाख रुपये मिळाले. या दोघांमधील WhatsApp संभाषणाचे (चॅटचे) पुरावेही जप्त करण्यात आले आहेत. या PDF मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांवरील प्रश्नांचा समावेश होता.

6. मांगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल: यश यादवने परीक्षेची प्रश्नपत्रिका या तीन आरोपींच्या स्वाधीन केली आणि त्यांच्याशी एक व्यवहार निश्चित केला. ही प्रश्नपत्रिका पुढे साखळी पद्धतीने पुन्हा विकून त्यातून अधिक नफा कमावण्याची त्यांची योजना होती.

NEET Paper Leak Case: CBI Arrests Pune Biology Professor Manisha Mandhare

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*

    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात