राष्ट्रवादीत बिनसले की शिंदेंचे काही बिघडले??; कारण ब्रेक के बाद जरांगे पुन्हा मैदानात आले!!

Shinde

नाशिक : ब्रेक के बाद मनोज जरांगे पुन्हा मैदानात आले. म्हणूनच राष्ट्रवादीत बिनसले की शिंदेंचे काही बिघडले??, असे सवाल विचारायची वेळ आली.Shinde, whether it is a failure in the Nationalist Party??; Because after the break, Jarange came back to the field!!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार कुटुंबीय विरुद्ध इतर असा संघर्ष रंगलाय आणि नेमक्या त्याच “पॉलिटिकल टायमिंगला” मनोज जरांगे यांनी नव्या आंदोलनाची घोषणा केली. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविषयी पुन्हा संशय आणि शंका निर्माण झाली.

पण त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत मनोज जरांगे यांना भेटल्याची बातमी आली. त्यामुळे एकनाथ शिंदेंचे काही बिघडले आहे का??, की त्यांची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा पुन्हा उफाळून आली??, असे दोन सवाल समोर आले.



 पवार आणि जरांगे

मनोज जरांगे यांनी आत्तापर्यंत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जेव्हा आंदोलन केले, त्यावेळी मूळ मुद्द्यापेक्षा त्याच्या “पॉलिटिकल टायमिंग” वर जास्त शंका आणि संशय उपस्थित झाले. शरद पवार आणि मनोज जरांगे यांचे राजकीय गुरु शिष्याचे नाते आधीच सगळ्यांना माहिती झालेय. साहेबांची काय ऊर्जा आहे!!, असे म्हणून मनोज जरांगे यांनी ते नाते अधिक जाहीर करून टाकले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला सगळा इंधन पुरवठा रोहित पवारांच्या अनुयायांनी केला.

– एकनाथ शिंदेंचे गुळपीठ

मनोज जरांगे यांच्या सुरुवातीच्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगली शिष्टाई केली होती. मनोज जरांगे यांना नवी मुंबईतच थोपविण्यात ते यशस्वी झाले होते. त्यानंतर मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे यांच्यातले गुळपीठ महाराष्ट्राच्या समोर आले होते.

– मास्टर माईंडच्या इशाऱ्यानुसार आंदोलन

पण मनोज जरांगे यांनी नेहमीच “पॉलिटिकल टायमिंग” साधून किंवा त्यांच्या मास्टर माईंडच्या इशाऱ्यानुसार आंदोलन केल्याचे लपून राहिले नाही. त्यामुळे मनोज जरांगे यांना मिळणारा प्रतिसाद टप्प्याटप्प्याने घटत गेला. मुंबईतल्या आझाद मैदानावरचे आंदोलन तर त्यांना गुंडाळावे लागले. त्यामध्ये मुंबई हायकोर्टाच्या दणक्याची भीती होती.

– आंदोलनाविषयी शंका

पण आता सुद्धा ज्यावेळी मनोज जरांगे यांनी त्यांच्या आंदोलनाची घोषणा केली, त्यावेळी राष्ट्रवादीची अंतर्गत भांडणे बाहेर आलेली दिसली. शरद पवारांचे कार्ड आजारानंतर पुन्हा “ऍक्टिव्हेट” झालेले दिसले. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या नव्या आंदोलनाबद्दल संशय आणि शंका वाढल्या. त्यावर अनेकांनी टीकाटिप्पण्या केल्या. जरांगे आणि त्यांचे समर्थक नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चिडले. पण आज फडणवीस समर्थकांनी पहिल्याच दिवशी मनोज जरांगे यांना घेरायला कमी केले नाही. त्यामुळे जरांगे यांच्या संभाव्य आंदोलनाच्या विषयी दाट शंका निर्माण झाली.

Shinde, whether it is a failure in the Nationalist Party??; Because after the break, Jarange came back to the field!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात