राहुल पासून उद्धव पर्यंत सगळ्यांचे ममतांना फोन; पण पवारांचा ना ममतांना फोन, ना बंगालवर प्रतिक्रिया; पवार INDI आघाडीपासून तुटले??

Sharad Pawar

 

नाशिक : राहुल गांधी यांच्यापासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सगळ्यांनी ममता बॅनर्जींना फोन केले. त्यांच्या पराभवाविषयी सांत्वन केले. त्यांच्या बाजूने उभे राहिल्याचे आश्वासन दिले, पण या सगळ्यांत शरद पवारांनी ममता बॅनर्जींना ना फोन केला, ना पश्चिम बंगालवर त्यांनी कुठली प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे दिसून आले. शरद पवारांचे सोडा, सुप्रिया सुळे यांनी सुद्धा ममता बॅनर्जींना पवारांच्या वतीने फोन केल्याची कुठली बातमी आली नाही. त्यामुळेच बाकीचे सगळे नेते INDI आघाडीमध्ये एकवटले असताना शरद पवार मात्र आघाडीपासून तुटले की काय?? याविषयी दाट संशय निर्माण झाला.Sharad Pawar didn’t rang up Mamata Banerjee; Sharad Pawar defects INDI alliance



– ममतांना सगळ्या नेत्यांचे फोन

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्यानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव, हेमंत सोरेन या सगळ्या नेत्यांनी ममता बॅनर्जी यांना फोन करून त्यांचे सांत्वन केले. त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले. ममता बॅनर्जींनी स्वतःच पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांची नावे घेऊन ही बातमी सांगितली. पण ममता बॅनर्जींनी फोन केलेल्या नेत्यांमध्ये शरद पवारांचे नाव घेतले नाही. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांचे नाव सुद्धा घेतले नाही. त्यावेळीच पवारांच्या भूमिकेविषयी खरा संशय बळावला.

– पवारांच्या इतर “पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी” सुरू

पण त्या पलीकडे जाऊन शरद पवारांनी कुठली “पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी” थांबवली असेही दिसले नाही. कारण याच दरम्यानच्या काळात विधान परिषदेवर निवडून आलेले शिवसेनेचे नेते अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर आदींनी त्यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो शरद पवारांनी स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले. त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीचे फोटो वडेट्टीवार यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वरून शेअर केले.

– बंगालवर पवारांची प्रतिक्रियाही नाही

एवढी सगळी “पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी” करून सुद्धा शरद पवारांनी पश्चिम बंगाल किंवा तामिळनाडू किंवा अन्य राज्यातल्या विधानसभांच्या निवडणुकीच्या निकालावर आपल्या सोशल मीडिया हँडल वरून एका शब्दाचीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. किंवा पत्रकारांना बोलवून त्यांच्याशी त्यासंदर्भात बातचीत देखील केली नाही. ज्यावेळी सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका चालू होत्या त्याच वेळी बारामतीची पोटनिवडणूक सुरू होती विधानसभा निवडणुकांच्या निकालांबरोबरच बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागून त्यामध्ये सुनेत्रा पवार निवडून आल्या. त्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वरून सुनेत्रा पवारांचे अभिनंदन केले. सुप्रिया सुळे यांनी बाकीच्या विधानसभा निवडणुकांच्या विषयी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पण त्यांनी ममता बॅनर्जी यांना फोन केल्याची कुठली बातमी आली नाही.

– पवार अलिप्त, की आघाडी पासून तुटले??

पश्चिम बंगालमध्ये राजकीय गदारोळ सुरू असताना विरोधकांपैकी बाकीचे सगळे नेते ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले पण शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी ममतांविषयी कुठेच “ममता” न दाखवता अलिप्त राहणे पसंत केले हेच त्यांच्या राजकीय वर्तणुकीतून दिसून आले याचाच अर्थ INDI आघाडीमध्ये सर्व नेते एकवटले असताना पवार मात्र त्या आघाडीपासून तुटले. त्यांना एक तर त्या आघाडीची गरज राहिली नाही किंवा त्या आघाडीतल्या नेत्यांना शरद पवारांची गरज उरली नाही.

Sharad Pawar didn’t rang up Mamata Banerjee; Sharad Pawar defects INDI alliance

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात