१६ वी राष्ट्रीय जनगणना सुरू; “या” सरकारी संकेतस्थळावर अशी करा डिजिटल स्व – गणना!!

16th National Census

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सोळाव्या राष्ट्रीय जनगणनेचा ऐतिहासिक टप्पा आज सुरू झाला असून आजपासून स्व – गणनेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाची स्व – गणना डिजिटल स्वरूपात केली. त्याची माहिती त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर दिली.16th National Census begins; Do digital self-enumeration on this government website!!

– देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट असे :

चला, जबाबदार नागरिक बनूया; डिजिटल जनगणनेत आपला सहभाग नोंदवू या!!



मी माझ्या कुटुंबासह स्व – गणना पूर्ण केली आहे. तुम्ही या मोहिमेत सहभागी व्हा आणि आपली स्व – गणना पूर्ण करा.

16 व्या राष्ट्रीय जनगणनेचा ऐतिहासिक टप्पा सुरू झाला असून, आजपासून स्व – गणनेला प्रारंभ झाला आहे. ही देशातील पहिली डिजिटल जनगणना असल्याने प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेला आवाहन करतो की 1 ते 15 मे दरम्यान se.census.gov.in या संकेतस्थळावरून स्व-गणना पूर्ण करा.

‘आपली जनगणना, आपला विकास’ हा मंत्र लक्षात ठेवून जबाबदार नागरिक म्हणून आपल्या देशाच्या प्रगतीत हातभार लावूया!!

16th National Census begins; Do digital self-enumeration on this government website!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात