मिसिंग लिंकची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद; उद्घाटनाच्या कार्यक्रमात दिले प्रमाणपत्र

Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर तयार केलेल्या मिसिंग लिंकची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील लोणावळा परिसरात उभारलेल्या 22.33 मीटर रुंदीच्या जगातील सर्वात रुंद भूमिगत बोगद्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने दिलेले प्रमाणपत्र स्वीकारले.Missing Link entered the Guinness Book of World Records; Certificate given at the inaugural event

हा प्रकल्प आधुनिक अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट नमुना असून, घाट विभागातील वळणावळणाचा आणि धोकादायक प्रवास कमी करून अधिक सरळ, वेगवान आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार असून इंधन बचत आणि पर्यावरणीय लाभही साध्य होणार आहेत.



 

– मिसिंग लिंक चे उद्घाटन

त्याचवेळी मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी मध्ये मध्ये अडकलेल्या नागरिकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माफी मागितली. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंकच्या उद्घाटनानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली‌. या पत्रकार परिषदेत त्यांनी सुप्रिया सुळे यांना देखील चांगलेच सुनावले. त्यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारीच बसला होत्या.

– सुप्रिया सुळे अडकल्या वाहतूक कोंडीत

आज एक मे महाराष्ट्र दिन आणि सलग सुट्ट्यांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडून मुंबई आणि पुण्याच्या दिशेने गेले. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडी मध्ये खासदार सुप्रिया सुळे देखील अडकल्या. त्यांनी वाहतूक कोंडी मधूनच एक व्हिडिओ जारी करून राज्यातल्या फडणवीस सरकारच्या वाहतूक व्यवस्थापनावर टीका केली.

– देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेची दखल घेतली. सुप्रिया सुळे या वाहतूक कोंडी अडकल्या होत्या. त्यांनी व्हिडिओ जारी करून सरकारपर्यंत संदेश पोहोचविला. तो आमच्यापर्यंत पोहोचला पण सुप्रिया सुळे याच शेवटच्याच वाहतूक कोंडीत अडकल्या. इथून पुढे त्या वाहतूक कोंडी मध्ये अडकणार नाही कारण आमच्या सरकारने आजच मिसिंग लिंकचे उद्घाटन केले. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे या रस्त्यावर इथून पुढे वाहतूक कोंडी होणार नाही. त्यांचे सरकार ज्यावेळी होते, तेव्हा त्यांच्या सरकारने मिसिंग लिंकचे काम अडवून ठेवले होते, पण आमच्या सरकारने तो अडथळा दूर करून मिसिंग लिंकचे काम पूर्ण केले, याकडे देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांचे लक्ष वेधले. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले त्यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देवेंद्र फडणवीस यांच्या उजव्या हाताला बसल्या होत्या.

– कनेक्टिंग लिंक

याच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांची माफी मागितली. त्याचवेळी त्यांनी मिसिंग लिंक संदर्भात सर्व महत्त्वाची तांत्रिक आणि वाहतुकी संदर्भातली माहिती दिली. इथून पुढे मिसिंग लिंकला कनेक्टिंग लिंक असे म्हणावे अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

Missing Link entered the Guinness Book of World Records; Certificate given at the inaugural event

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात