अंबादास दानवे यांना काँग्रेसचा पाठिंबा मिळवून देण्यासाठी संजय राऊतांची काँग्रेसला पुढच्या पंतप्रधान पदाची ऑफर!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधान परिषदेतले ठाकरे सेनेचे उमेदवार अंबादास दानवे यांना काँग्रेसचा पाठिंबा मिळवून देण्यासाठी संजय राऊत यांनी काँग्रेसला थेट पुढच्या निवडणुकीत पंतप्रधान पदाची ऑफर देऊन टाकली. Ambadas Danve

काँग्रेसने विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यायची तयारी दाखवली होती, पण उद्धव ठाकरे यांनी स्वतःच उमेदवारी करायची नाकारली. स्वतः ऐवजी त्यांनी अंबादास दानवे यांची शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेसला स्वतःचा राजकीय पर्याय खुला झाला. काँग्रेसने विधान परिषदेसाठी स्वतःचा उमेदवार द्यायची घोषणा केली.



– संजय राऊतांची काँग्रेसला ऑफर

या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांच्या पराभवाची शक्यता दिसताच संजय राऊत यांनी काँग्रेसवर वेगळाच डाव टाकला. त्यांनी काँग्रेसला पुढच्या निवडणुकीत थेट पंतप्रधान पदाची ऑफर देऊन टाकली. राहुल गांधी पुढच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान व्हावेत अशी आमची इच्छा आहे. आम्ही त्यांना पाठिंबा देतो. त्यांनी स्वतःच पंतप्रधान पद नाकारून इतर कोणाला पंतप्रधान पद दिले तर शिवसेनेच्या काँग्रेसच्या नेत्याला सुद्धा पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देईल, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

– शिवसेनेचे दोन नेते गांधी भवनात

याच दरम्यान शिवसेनेचे दोन नेते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची समजूत काढण्यासाठी गांधी भवन मध्ये गेले त्यांनी सपकाळ यांना अंबादास दानवे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची विनंती केली.

Sanjay Raut offers the Congress party the post of the next Prime Minister in exchange for their support for Ambadas Danve!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात