राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी अभियानात नवी मुंबईतील ६० हून अधिक प्रकरणांची सुनावणी, महिलांना न्याय!!

विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी या अभियानांतर्गत आज सिडको भवनात महिला जनसुनावणी आयोजित करण्यात आली. या सुनावणीस राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. विजयाताई रहाटकर, ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. मिलिंद भारंबे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या वेळी ६० हून अधिक प्रकरणांची सुनावणी करण्यात आली, ज्यामध्ये घरगुती हिंसाचार, वैवाहिक नात्यांमधील तणाव आणि सायबर गुन्ह्यांशी संबंधित तक्रारींचा समावेश होता. सुनावणी दरम्यान प्राप्त झालेल्या माहितीनुसार विजयाताई रहाटकर यांनी प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना आणि निर्देश दिले.



– कोकण विभागीय आढावा बैठक

तत्पूर्वी, विजयाताई रहाटकर यांनी नवी मुंबईत कोकण विभागातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांच्या प्रशासकीय आणि पोलिस अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त, महानगरपालिका आयुक्तांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष आणि ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते.

– महिला केंद्रित योजनांचा आढावा

या बैठकीत महिला केंद्रित योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. तसेच ‘लखपती दीदी’ योजनेचा प्रभाव, पोषण मोहीम, बालविवाह प्रतिबंध, कार्यस्थळावरील लैंगिक त्रास प्रतिबंध (POSH कायदा) ची अंमलबजावणी, सायबर गुन्ह्यांची स्थिती आणि संरक्षण अधिकाऱ्यांच्या कामकाज अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.

– महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांशी चर्चा

मुंबईतील पोलीस मुख्यालयात सौ. विजयाताई रहाटकर यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांच्या उपस्थितीत राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची समीक्षा बैठक घेतली. त्यांनी नाशिक टीसीएस प्रकरण आणि परतवाडा (अमरावती) प्रकरण यांसारख्या सध्या चर्चेत असलेल्या मुद्द्यांसह महिलांवरील अत्याचारांच्या घटनांचा आणि त्यावरील तपासांचा आढावा घेतला. तसेच, राष्ट्रीय महिला आयोगाने वेळोवेळी घेतलेल्या सुओ मोटू (Suomoto) कारवाईवरही सखोल चर्चा केली.

National Commission for Women Jan Sunwai Campaign in Navi Mumbai

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात