विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगाल मध्ये तृणमूळ काँग्रेस वर मात करण्यासाठी भाजपने लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना खूश करायचा निर्णय घेतला असून त्यांना प्रत्येकी दरमहा ३००० रुपये देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले. त्याचबरोबर बेरोजगार युवकांना देखील ३००० रुपयांचा भत्ता देण्याची घोषणा जाहीरनाम्यात केली. Amit Shah
त्याच वेळी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, पोलीस भरतीसह अन्य सरकारी नोकरीत महिलांना ३३ % आरक्षण लागू करणे, ६ महिन्यांच्या आत बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करणे, त्याच बरोबर पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून ३००० रुपयांची अतिरिक्त मदत देणे, या घोषणांचा भाजपने जाहीरनाम्यात समावेश केला.
– भाजपशासित प्रत्येक राज्यांमध्ये समान नागरी कायदा
पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने 15 कलमी जाहीरनामा आज घोषित केला. हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली, ती म्हणजे भाजपशासित प्रत्येक राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करणारच!!
अमित शाह यांच्या हस्ते भाजपने पश्चिम बंगाल साठी 15 कलमी घोषणापत्र आज जाहीर केले. त्यानंतर अमित शाह यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी पत्रकारांनी समान नागरी कायद्याला ममता बॅनर्जींचा विरोध असताना तुम्ही तो कायदा पश्चिम बंगालमध्ये कसा लागू करणार??, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अमित शाह यांनी भाजपशासित प्रत्येक राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू होईलच, अशी घोषणा केली.
– अमित शाह म्हणाले :
– देशात सर्व धर्मीय लोक देशाचे नागरिक आहेत. देशाच्या नागरिकांसाठी एक समान कायदा लागू करणे म्हणजे तुष्टीकरण नाही, तर उलट एखादा नागरिक एकच विवाह करू शकेल आणि दुसरा कुठलाही नागरिक चार विवाह करू शकेल, अशी व्यवस्था टिकवून ठेवणे हे तुष्टीकरणाचे राजकारण आहे. ममता बॅनर्जींनी कितीही विरोध केला, तरी पश्चिम बंगाल मध्ये भाजप सत्तेवर आल्यावर समान नागरी कायदा लागू करेलच. भाजपशासित प्रत्येक राज्यामध्ये समान नागरी कायदा आम्ही लागू करू.
– समान नागरी कायदा लागू करण्याची शिफारस मूळात भाजपने केलेली नाही. ही शिफारस संविधान सभेनेच केली आहे. संविधानात सुद्धा यासंदर्भातला ठळक आणि स्पष्ट उल्लेख आहे.
#WATCH | Kolkata, West Bengal: On the implementation of the UCC in West Bengal, Union Home Minister Amit Shah says, "People of all religions are citizens of India… Is it appeasement to have uniform laws for every Indian citizen, or is it appeasement when one citizen is… pic.twitter.com/faNZcGJtXo — ANI (@ANI) April 10, 2026
#WATCH | Kolkata, West Bengal: On the implementation of the UCC in West Bengal, Union Home Minister Amit Shah says, "People of all religions are citizens of India… Is it appeasement to have uniform laws for every Indian citizen, or is it appeasement when one citizen is… pic.twitter.com/faNZcGJtXo
— ANI (@ANI) April 10, 2026
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App