विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशिक महापालिका आणि नववर्ष स्वागत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नववे गुरु तेगबहादुरसिंग जी यांच्या ३५० व्या स्मृती वर्ष निमित्त त्यांना हा कार्यक्रम समर्पित करण्यात आलेल्या भव्य महावादन कार्यक्रमाने शहरातील वातावरण ढोल – ताशांच्या गजरात दणाणून गेले. Mahavadana
शहरातील विविध भागांतील २५ ढोल पथकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दमदार वादन सादर केले. पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर उपस्थित नागरिकांनीही उत्साहाने प्रतिसाद देत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके आहेर, उपमहापौर विलास शिंदे, महापालिका आयुक्त मनिषा खत्री तसेच स्थायी समिती अध्यक्ष मच्छिंद्र सानप यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
तसेच नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष शिवाजी बोंदारडे, चंद्रशेखर जोशी, प्रफुल्ल संचेती आणि समितीचे सर्व सदस्य या कार्यक्रमात उपस्थित होते. सर्व ढोल पथकांनी सादर केलेल्या जोशपूर्ण वादनामुळे परिसरात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पारंपरिक संस्कृती जपण्याचा संदेश देणारा हा महावादन कार्यक्रम नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादात उत्साहात पार पडला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App