Cuttack Hospital Fire : कटकच्या सरकारी रुग्णालयात आग, 10 रुग्णांचा मृत्यू; लोकांना वाचवताना 11 कर्मचारी भाजले

Cuttack Hospital Fire

वृत्तसंस्था

कटक : Cuttack Hospital Fire  ओडिशातील कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज रुग्णालयात आग लागली. रविवारी मध्यरात्री 3 वाजता झालेल्या या दुर्घटनेत 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या ट्रॉमा केअरच्या आयसीयूमध्ये आग लागली होती.Cuttack Hospital Fire



रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवताना रुग्णालयातील किमान 11 कर्मचारीही भाजले. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

आग लागली त्यावेळी तेथे सुमारे 23 रुग्ण दाखल होते. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु आयसीयूमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जात आहे. मात्र, मुख्यमंत्री मांझी यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

Cuttack Hospital Fire: 10 Dead in SCB Medical College ICU; CM Announces ₹25 Lakh Ex-Gratia VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात