ठाण्याच्या आनंद आश्रमात एकनाथ शिंदे यांची धुळवड साजरी; पण साधेपणाने!!

Eknath Shinde

विशेष प्रतिनिधी

ठाणे : धुळवडीच्या सणानिमित्त प्रथेप्रमाणे आज ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंदआश्रम येथे उपस्थित राहून एकनाथ शिंदे यांनी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला रंग लावून विनम्रपणे अभिवादन केले. पण एकनाथ शिंदे यांनीही धुळवड साधेपणाने साजरी केली.Eknath Shinde’s Dhulwad celebrated at Anand Ashram in Thane; but with simplicity!!

पण यंदा शिवसेना परिवारातील काही जवळच्या व्यक्तींचा कुटुंबीयांचे निधन झाल्यामुळे धुळवडीचा सण साजरा करायचा नाही असा निर्णय मी घेतला. तरीही हा सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद आणि सप्तरंगाची उधळण करणारा ठरो अशा शुभेच्छा याप्रसंगी सर्वांना दिल्या.



यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, बाळा गवस, कमलेश चव्हाण, स्वानंद पवार तसेच शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एरवी एकनाथ शिंदे धुळवड हा सण मोठ्या जल्लोषात साजरा करतात. संपूर्ण राज्यभरातून शिवसैनिक ठाण्यात जमा होतात ठाण्यातल्या शिवसैनिकांना तर धुळवडीमध्ये विशेष उत्साह असतो. परंतु, यंदा एकनाथ शिंदे यांनी अत्यंत साधेपणाने धुळवड साजरी केली.

Eknath Shinde’s Dhulwad celebrated at Anand Ashram in Thane; but with simplicity!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात